चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; वाढतायत नवे रुग्ण

पीटीआय
Sunday, 12 April 2020

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीन सरकारने टाळेबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४६ रुग्ण आढळून आले असून, आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बीजिंग - चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीन सरकारने टाळेबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४६ रुग्ण आढळून आले असून, आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चौघे चीनचे रहिवासी
कोरोनाची लागण झालेले चार जण चीनमधील रहिवासी आहेत तर उर्वरित सर्व रुग्ण परदेशातून चीनमध्ये दाखल झालेले आहेत. अचानक ४६ नविन रुग्ण सापडल्यानंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाची संकट घोंगावत आहे. चीनमध्ये आढळलेल्या ४६ नव्या रुग्णांपैकी ३४ जण असे आहेत की त्यांच्यामध्ये कोरोना असल्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र, त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

दरम्यान चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, चीनमध्ये परदेशातून आलेल्या आणि कोरोना बाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार १८३ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी ४४९ जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, ७३४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे. चीनमध्ये शुक्रवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे ८१ हजार ९५३ जण आजारी पडले असून. त्यापैकी १ हजार ८९ रुग्णांवर अजून उपचार सुरू असून ७७ हजार ५२५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, ३ हजार ३३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china new patients number