Coronavirus : लोकांच्या जीवाशी खेळतोय चीन? 'या' देशाला पाठवले 60 हजार नकली मास्क

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच चीन लोकांच्या जीवाशी खेळतोय का? असा प्रश्न पडला आहे. काही देशांमध्ये कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांचा अभाव आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय वस्तूंची प्रचंड कमतरता आहे. अशात चीनने बऱ्याच देशांना मास्क देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी कॅनडाला 60 हजाराहून अधिक मास्क पाठवले होते. मात्र, यातील बहुतेक मास्क नकली असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच चीन लोकांच्या जीवाशी खेळतोय का? असा प्रश्न पडला आहे. काही देशांमध्ये कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांचा अभाव आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय वस्तूंची प्रचंड कमतरता आहे. अशात चीनने बऱ्याच देशांना मास्क देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी कॅनडाला 60 हजाराहून अधिक मास्क पाठवले होते. मात्र, यातील बहुतेक मास्क नकली असल्याचे समोर आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व देश या विषाणूला हरवण्यासाठी एकत्र लढत आहेत. मात्र, चीन धोका देत आहे का? असा प्रश्न सातत्याने पडत आहे. यापूर्वीही अनेक देशांना वैद्यकीय साहित्य देताना चीनकडून नकली साहित्य पाठवण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चीनने पाठवलेल्या या नकली मास्कमुळे कॅनडामध्ये परिस्थिती बिघडली आहे. लोकांकडे मास्क नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

कॅनेडियन सरकारने असा संशय व्यक्त केला आहे की, खराब मास्कमुळेच आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली. यासाठी कॅनडा सरकारने तपासाकरिता सुरुवात केली आहे. चीनने काही दिवसांपूर्वी टोरंटो येथील एका रुग्णालयात हे मास्क पाठवले होते. कॅनडामधील या रुग्णालयातील मास्क फाडले जात आहे. इतकेच नाही तर स्पेन, नेदरलँड्स, झेक प्रजासत्ताक आणि तुर्की यांसारख्या देशांनाही चीनने खराब दर्जाचे मास्क पाठवले होते. कॅनडामधील सर्व ठिकाणांहून वाईट मुखवटे सापडल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र टोरंटोमध्ये चीनने नकली मास्क पाठवल्याचे समोर आले आहे. कॅनडामध्ये सध्या 19 हजार 277 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 435 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

याआधी चीनने पाकिस्तानला अंडरविअरपासून तयार केलेले मास्क पाठवले होते. चीनने मास्क पाठवल्यानंतर टोरंटोमधील 10 केअर होममध्ये 19 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, सर्वत्र वेगवेगळे मास्क समोर आले आहेत, यामुळे चिंता वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus China sent Canada thousands of duplicate masks