चीनमधील वुहानचा लॉकडाऊन हटला; पण, एक गोष्ट सुरूच राहणार!

टीम ई-सकाळ
Friday, 10 April 2020

परदेशातील लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच, चीनला रूग्ण शोधण्याची क्षमता याबद्दल चिंता आहे

Coronavirus : चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने जगभरात १४ लाखापेक्षा अधिक लोकांना संक्रमित केले आहे आणि यात  ८७ हजार ७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने संपूर्ण चीनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेथील अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याच्या दृष्टीने दोन महिने लॉकडाऊनमध्ये असताना सुद्धा नियमितपणे रहिवाशांची तपासणी केली जात आहे. परदेशातील संक्रमित रूग्णांची संख्या वाढण्याबरोबरच, चीनला संक्रमित रूग्ण शोधण्याची क्षमता याबद्दल चिंता आहे आणि वुहानमधील सरकारने जनतेला जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वुहानमधील तान्हुलिन शेजारची देखभाल करणाऱ्या समाजसेवकांच्या गटाचे संचालक फेंग जिंग यांनी शुक्रवारी पत्रकारांच्या सरकारी दौऱ्यावर सांगितले की, ते रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात तपासणी करत राहणार आहेत. त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही रोज सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करतो आणि त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल तपशीलवार नोंद ठेवतो. सध्या आपल्या आसपास  एक संसर्ग रोग मुक्त समुदाय आहे - आतापर्यंत ४५ दिवस झाले आहेत.  त्यामुळे आपल्यात आता नवीन संक्रमणाची  परिस्थिती नाही.’ नेत्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांना गती देण्याची,  देशांतर्गत मागणीला चालना देण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना कामावर परत आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी नवीन कोरोना प्रकरणात चीनमध्ये घट झाल्याची नोंद झाली आहे. गुरुवारी देशात ४२नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून,  ज्याच्या एक दिवस आधी ६३ होती.

आणखी वाचा - अमिताभ गुप्तांवरील कारवाई किरकोळच?

प्रिमिअर ली केकियांग यांच्या अध्यक्षतेखालील चीनच्या केंद्र सरकारच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सने गुरुवारी सांगितले की, संसर्गग्रस्त लोकांना देशाच्या सीमारेषा ओलांडण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने उद्दीष्टात्मक उपाययोजना राबविताना ते अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्नांना वेग देणार आहेत. चीनने आता अर्थव्यवस्थेत सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी “सक्रियपणे अनुकूल परिस्थिती निर्माण” करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. परंतु, तरीही अशा परिस्थितीत कोरोनाच्या पुनरागमन होण्याचा धोका असल्याची त्यांनी चेतावणी दिली. शांघायमध्ये, ऑनलाईन अफवा दूर करण्यासाठी राज्य मीडिया देखील तैनात करण्यात आले आहे.

आणखी वाचा - चीनची पुन्हा बनावटगिरी; युरोपमधील देशाला निकृष्ट मास्क

सरकारने आता जास्त जोखमीच्या क्षेत्रांना हाताळण्यासाठी संसाधने तैनात करण्याचे आश्वासन दिल्याने बहुतेक लक्ष हेलॉन्गजियांगकडे लागले आहे.  ज्यांनी गुरुवारी रशियाकडून सीमा ओलांडल्याच्या २८ नवीन घटनांची नोंद झाली. प्रांतामध्ये आतापर्यंत बाहेरून आलेल्या  संक्रमित व्यक्तींची १५४ प्रकरणे आढळली आहेत. चिनी शहर वुहानमध्ये सन २०१९च्या उत्तरार्धात सर्वप्रथम हा विषाणू पसरला होता. तेव्हापासून जगभरात १४ लाखपेक्षा अधिक लोक संक्रमित झाले असून, यात ८७ हजार ७००हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सरकारने त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लादल्याने या महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर परिणाम होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china wuhan city will continue examine people