युरोप सापडला महामंदीच्या कात्रीत; उद्योगांपुढे आव्हान

पीटीआय
Sunday, 12 April 2020

आशेचे किरण
युरोप-अमेरिकेत बळींची संख्या वाढत असली तरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. स्पेन, इटली, फ्रान्स आणि अमेरिकेत रुग्ण संख्या आश्चर्यकारकरित्या कमी होत आहे. ब्रिटनमध्येही पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती बरी होत असल्याने या देशाने सुटकेचा निश्वास सोडला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुमारे ९० देशांना मदत दिली आहे. युरोप, अमेरिकेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. अर्थात, येमेनमध्ये पहिला रुग्ण सापडणे, ब्राझील आणि भारतात संख्या वाढणे या बाबी चिंता वाढविणाऱ्या आहेत.

रोम - कोरोनाबळींच्या संख्येने जगभरात एक लाखांहून अधिक जणांचा घेतलेला बळी आणि आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या महामंदीचा इशारा, यामुळे बहुतेक देश कात्रीत सापडले आहेत. कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या युरोपमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी करतानाच अर्थव्यवस्थेचेही आरोग्य टिकविण्याचे आव्हान युरोपसमोर आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनमुळे युरोपमध्ये सर्व उद्योग ठप्प झाले आहेत. १९३० मध्ये आलेल्या महामंदीपेक्षाही यंदाचे संकट मोठे असणार असल्याचा इशारा जागतिक नाणेनिधीने 
दिला आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी न वाढवता उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यासाठी युरोपीय देशांमध्ये दबाव वाढत आहे. त्याचवेळी, घाई करत लॉकडाउन उठविल्यास कोरोनाचा संसर्ग आणखी वेगाने वाढेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनेही दिला आहे. जगातील एकूण बाधितांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली असून मृतांची संख्याही काल (ता.१०) रात्रीच एक लाखाच्या वर गेली. यातील ७० टक्के मृत युरोपातील आहेत. याचाही धसका युरोपीय देशांनी घेतला आहे.

आशेचे किरण
युरोप-अमेरिकेत बळींची संख्या वाढत असली तरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. स्पेन, इटली, फ्रान्स आणि अमेरिकेत रुग्ण संख्या आश्चर्यकारकरित्या कमी होत आहे. ब्रिटनमध्येही पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती बरी होत असल्याने या देशाने सुटकेचा निश्वास सोडला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुमारे ९० देशांना मदत दिली आहे. युरोप, अमेरिकेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. अर्थात, येमेनमध्ये पहिला रुग्ण सापडणे, ब्राझील आणि भारतात संख्या वाढणे या बाबी चिंता वाढविणाऱ्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus europe lockdown economic crisis