म्हणून, युरोपमध्ये वाढतायत कोरोनाचे बळी; इटली, फ्रान्समध्ये चिंताजनक स्थिती

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 मार्च 2020

युरोपमध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. इटलीमध्ये बळींची संख्या वाढत असताना, आता फ्रान्समध्ये परिस्थिती बिकट होत असल्याचे दिसत आहे.

रोम (इटली) Coronavirus:गेल्या दोन महिन्यांत चीनमध्ये कहर केलेल्या कोरोना व्हायरसने आता युरोपमध्ये वेगानं पसरायला सुरुवात केलीय. इटलीनंतर फ्रान्स, स्पेन या देशांना आता कोरोना व्हायरसनं कवेत घ्यायला सुरुवात केलीय. ज्या वेगानं युरोपमधील नागरिकांना कोरोनाची लागण होतेय. त्याच वेगानं कोरोना नागरिकांचा बळी घेत आहे. गेल्या 24 तासांच फ्रान्स, इटलीमध्ये कोरोनोग्रस्तांनी आतापर्यंतचे सर्वाधिक बळी गेले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इटलीमध्ये काय परिस्थिती?
जगात चीननंतर वेगानं कोरोना पसरला असेल तर तो, इटलीमध्ये पसरला. चिंतेचीबाब म्हणजे, इटलीमध्ये कोरोना वेगानं पसरत आहे. इटलीमध्ये लोंबर्डी प्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. लोंबर्डी राज्यात आतापर्यंत 1 हजार 218 जणांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळं दगावणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. आधीच आजारी असलेल्या वृद्धांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. तसेच त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळं कोरोनाशी लढताना त्यांचं शरीर साथ देत नाही. मुळात युरोपमध्ये 25 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही 65वर्षांच्या वरील आहे. त्यामुळं युरोपमध्ये कोरोना झपाट्याने नागरिकांचे बळी घेत आहे. इटलीमध्ये रविवारी कोरोनाने 368 जणांचा बळी घेतला. त्यामुळं इटलीतील कोरोनाच्या बळींची संख्या 1 हजार 809वर गेली आहे. शनिवारी इटलीत 21 हजार 157 रुग्ण होते. रविवारी त्यात वाढ झाली असून, सध्या इटलीत 24 हजार 747 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Image may contain: one or more people, people sitting and screen

आणखी वाचा - पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदीची शक्यता

चीन सावरला, बाहेर बळी वाढले!
कोरोनाची भयानक स्थिती चीनमध्ये पहायला मिळाली. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळं चीनमध्ये कोरोना वेगानं पसरला. आतापर्यंत एकट्या चीनमध्ये 3 हजार 208बळी गेले आहेत. पण, चीनच्या बाहेरही कोरोना वेगानं पसरला असून, आता चीनबाहेरील मृत्यांच्या संख्येत वाढ झाली असून, ती चीनपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत चीनमध्ये 3 हजार 208 बळी गेले असताना, चीनच्या बाहेर 3 हजार 241 जणांचा प्राण गमवावे लागले आहेत. चीनच्या बाहेर 86 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर, चीनमध्ये 80 हजार 860 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सर्वाधिक वाईट स्थिती असलेल्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोना हद्द पार झाला आहे.

आणखी वाचा - मुंबईत जमावबंदी, वाचा काय झाला निर्णय

फ्रान्समध्ये बळी वाढले
युरोपमध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. इटलीमध्ये बळींची संख्या वाढत असताना, आता फ्रान्समध्ये परिस्थिती बिकट होत असल्याचे दिसत आहे. फ्रान्समध्ये रविवारी एका दिवसात 29 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, फ्रान्समधील बळींची संख्या आता 120 वर गेली आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 900 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 5 हजार 400 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, कोरोनाशी लढण्याची तयारी केलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus europe update france reported highest deaths in 24 hours

टॉपिकस