युरोप, अमेरिकेला एकच चूक पडली महागात!

टीम ई-सकाळ
Saturday, 4 April 2020

गेल्या चार महिन्यात जगभरातील १० लाखाहून अधिक नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून ६० हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.  

बीजिंग Coronavirus : अमेरिका आणि युरोपिय देशात कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या वाढत असून यासाठी काहीअंशी स्थानिक नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. मास्क न वापरण्याचे धोरण नागरिकांच्या जीवावर बेतले असल्याचे चीनच्या शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. अमेरिकेत एकाच दिवसात दीड हजार नागरिकांचा मृत्यू झाला तर युरोपातही आकडा वाढत आहे. या पाश्‍र्वभूमीवर चीनच्या शास्त्रज्ञंनी त्यांना सावध केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मास्क अत्यावश्यक
गेल्या चार महिन्यात जगभरातील १० लाखाहून अधिक नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून ६० हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.  अमेरिकेसह युरोप आणि भारतीय उपखंडात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत असताना चीनमध्ये मात्र त्यावर नियंत्रण प्रस्थापित होत आहे. काही भागातील निर्बंधही हटविण्यात आले आहेत. परंतु आता युरोपीय देश इटली आणि स्पेनबरोबरच अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या पाश्‍र्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. संसर्गाला रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यावश्‍यक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील २ लाख ७८ हजार जणांन कोरोनाची बाधा झाली आहे. युरोपमध्येही काल मृतांचा आकडा ४० हजारावर पोचला आहे. स्पेनमध्ये एकाच दिवसात ९०० जण मृत्युमुखी पडले. अनेक देशात मास्कचा तुटवडा भासत आहे.

आणखी वाचा - हा संयमाचा खेळ, ज्याचा संयम सुटला तो हरला!

आणखी वाचा - अंडरवेअरचे, मास्क पाकिस्तानच्या गळ्यात

सर्वांत मोठी चूक
या दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी मास्कशिवाय घराबाहेर पडणे म्हणजे धोका पत्करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. सायन्स नावाच्या संकेतस्थळाने म्हटले की, सध्याच्या काळात प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. चायनिज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲड प्रिव्हेशनचे शास्त्रज्ञ जॉर्ज गाओ यांनी संकेतस्थळावर म्हणाले, की युरोप आणि अमेरिकेतील बहुतांश नागरिक मास्कविना घराबाहेर जात असून ही सर्वात मोठी चूक ठरत आहे. हा व्हायरस शिंक आणि संपर्कात आल्याने पसरतो. या ठिकाणी शिंक महत्त्वाची मानली जात आहे. बोलताना आपल्या तोंडातून थेंब बाहेर येत असतात. अशा स्थितीत मास्क असल्यास संसर्गाचा प्रसार होत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus Europeans Americans biggest mistake avoided masks