Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाखांवर गेला आहे. जगात एकूण १५ लाख १८ हजार ७१९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची जगभरातील संख्या बुधवारी ८८ हजार ५०२ वर पोहचली आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाखांवर गेला आहे. जगात एकूण १५ लाख १८ हजार ७१९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची जगभरातील संख्या बुधवारी ८८ हजार ५०२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण ०३लाख ३०हजार ५८९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या डिसेंबरमध्ये चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यानंतर १९२ देशांमध्ये कोरोना संसर्गाची १५ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. प्रत्यक्षरित्या अनेक देश अजूनही अतिशय गंभीर प्रकरणांची केवळ तपासणीच करत आहेत, असे निदर्शनास आल्याने हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी अखेर पहिला मृत्यू नोंदवलेल्या इटलीमध्ये सर्वाधिक, म्हणजे १७,१२७ मृत्यू झाले आहेत. येथे कोरोनाबाधितांची संख्या १,३५,५८६ इतकी असून, २४,३९२ लोक बरे झाले आहेत. स्पेनमध्ये १४,५५५ मृत्यूंची नोंद झाली असून, १,४६,६९० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

अमेरिकेतील करोनाबळींची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची, म्हणजे १२ हजार ९११ इतकी आहे. फ्रान्समध्ये १० हजार ३२८ लोकांचे कोरोनामुळे बळी गेले असून, १०९०६९ लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. याखालोखाल असलेल्या ब्रिटनमध्ये ६,१५९ लोक मरण पावले असून, करोना संसर्गाची ५५,२४२ प्रकरणे झाली आहेत. चीनने आतापर्यंत ३३३३ कोरोनाबळी जाहीर केले आहेत. त्या देशात करोनाबाधितांची ८१,८०२ प्रकरणे असून, ७७,२७९ लोक करोनामुक्त झाले आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजाराच्या वर गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Global cases at 1518720 death toll hits 88502

Tags
टॉपिकस
Topic Tags: