अभिमानास्पद : स्वित्झर्लंडच्या पर्वतावर भारताचा तिरंगा

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

स्वित्झर्लंडने भारतासोबत एकजूटता दाखवण्यासाठी स्विस आलप्सच्या मॅटरहॉर्न पर्वतावर भारताच्या तिरंगाच्या रोषणाई केलीय.

Coronavirus : कोरोना विरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग एकवटलंय. अनेक देश आपसातील मतभेद विसरून एकमेकांना साथ देत आहेत. युरोपमधील स्वित्झर्लंडने आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत असल्याचं दाखवून दिलंय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वित्झर्लंडने भारतासोबत एकजूटता दाखवण्यासाठी स्विस आलप्सच्या मॅटरहॉर्न पर्वतावर भारताच्या तिरंगाच्या रोषणाई केलीय. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. जेव्हा भारताच्या स्वित्झर्लंडमधील भारतीय दुतावासाने या संदर्भात ऑफिशिअल ट्विट केल्यानंतर त्याची खात्री पटली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दुतावासाचे ते ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळं भारतीयांची छाती अभिमानानं फुलली आहे. भारताच्या तिरंग्याचा विदेशात असा सन्मान होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दुबईतील बुर्ज खलिफा या सर्वांत उंच इमारतीवर तसेच फ्रान्सची राजधानी पॅरीसमधील आयफेल टॉवरवर आणि अशा जगभरातील अनेक प्रसिद्ध इमारतींवर भारताच्या तिरंग्याला सन्मानाने स्थान देण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus indian flag switzerland matterhorn mountain