Coronavirus : सलाम ! अमेरिकेतही भारतीयांचे जोरदार मदतकार्य !

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 12 April 2020

नुसती कानोकानी बतमी पसरताच भारतीय लोकानीं स्वतःहून मदतीचा ओघ चालू केला. आजपर्यंत हजारो बेघर लोकांना चविष्ट शाकाहारी जेवण देण्यात आले आहे. संस्थाने दहा हजार जेवणे पुरवण्याची सोय केली आहे.

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना विषाणूने सर्वाधिक हाहाकार जर कुठे माजवला असेल तर तो अमेरिकेत. एकट्या अमेरिकेत अवघ्या महिनाभरातच विषाणूबाधित रुग्णांची संख्या तब्बल साडे पाच लाखावर पोहचली आणि त्यात दिवसागणिक दोन, दोन हजार बळी पडू लागले. बघता बघता एकविस हजारावर लोकांनी महिनाभरातच जीव गमावला. एवढ्याशा ह्या शत्रूने ही खंडप्राय महासत्ता शरण आणली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तेजीच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर पोहचलेली अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली. बळींमध्ये इतर वंशाच्या लोकांबरोबरीनेच भारतीय वंशाच्या लोकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पूर्ण अमेरिका आज शोकाकुल आहे. अशा संकटसमयी भारतीयांनी मात्र एकजुटीने मदत कार्य आरंभले आहे. देऊळे आणि गुरुद्वारा गरजुना जेवू घालत आहेत.

Coronavirus : एलआयसीकडूनही हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ

अमेरिकेच्या रॅले शहरातही भारतीय लोकांनी ताबडतोब मदत कार्य सुरु केले. एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यासाठी मास्क शिवून देण्याची जबादारी   बायकांनी आणि जेष्ठ नागरिकांनी पटकन उचलली आणि त्यांना शहरातील इतर हॉस्पिटल मधूनही मास्क साठी फोन येऊ लागले. स्थानिक टीव्ही वाहिन्यांनी ही बातमी दिल्यावर आजूबाजूच्या गावातूनही मास्कसाठी फोन येऊ लागले. आजवर शेकडो मास्क पुरवण्यात आले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना ह्या संस्थेचे अध्यक्ष, मूळचे नाशिकचे रहिवासी मनोज पंड्या म्हणाले की शहरातील निराश्रित लोकांसाठी चालवण्यात येणाऱ्या केंद्रातील अन्नछत्रात अन्नाचा तुटवडा भासू लागला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्वरित चौकशी केली. गेली पंधरा वर्षे चालू असलेल्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात जेवण पुरविण्याचा अनुभव गाठीशी होताच. हाकेसरशी सर्व नागरिक धावून आले. अभिजित देशमुख म्हणाले नुसती कानोकानी बतमी पसरताच भारतीय लोकानीं स्वतःहून मदतीचा ओघ चालू केला. आजपर्यंत हजारो बेघर लोकांना चविष्ट शाकाहारी जेवण देण्यात आले आहे. संस्थाने दहा हजार जेवणे पुरवण्याची सोय केली आहे. अजून परिस्थीती ओटाक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे  गरज आणखीही बराच काळ लागणार आहे.

संस्थेचे प्रसाद सातघरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी समस्या ही लॉकडाउनचे नियम पाळून कार्यकर्त्याची सुरक्षा सांभाळून देवळात जेवण तयार कसे करणार ही आहे. अमेरिकेतील तयार अन्नाचे नियमही फार जाचक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हजारोंसाठी जेवण बनविणे हे मुश्किल काम असते. ह्या घडीला कामगार आणि पदार्थ दोन्हीचा तुटवडा असताना इतक्या मोठ्या संख्येत गरजूंच्या मदतीस धावून जाणाऱ्या भारतीय समाजाने अमेरिकेची मने जिंकली आहेत व अमेरिकन हिंदूं समाजाने दुधात साखरेसारखी मिसळण्याची शिकवण अमेरिकेला दिली आहे. 

अधिक माहिती किंवा मदतीसाठी संपर्क करा 
ललित महाडेश्वर
अध्यक्ष अमेरिका-भारत मैत्री समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Indians Provide Lunch facilities in the United States