लॉकडाऊनमध्ये गावाला भुतानं ‘पछाडलं’

टीम ई-सकाळ
Monday, 13 April 2020

इंडोनेशिया मधील जावा बेटावरील केपूह गावात कोरोनापासून लोकांना वाचविण्यासाठी व त्यांना घरात बसवण्यासाठी रस्त्यांवर चक्क भूतांना तैनात करण्यात आलंय. 

Coronavirus : इंडोनेशियातील केपुह गाव सध्या भुतांनी पछाडले आहे. रहस्यमय पांढऱ्या रंगाचे कपडे आणि  अनोळखी  असणारे लोक बाहेर रात्री पडत असून आकाशात हळू हळू पुढे सरकत असल्याचे चित्र या केपूह गावात पाहायला मिळत आहे. जावा बेटावरील या गावाने रस्त्यावर गस्त घालण्यासाठी भूतांची एक टोळी तैनात केली आहे. तेथील लोकांना अशी आशा आहे की, जुन्या अंधश्रद्धा लोकांना घराच्या आत आणि कोरोनापासून सुरक्षित ठेवतील. कोरोनाचा संसर्ग पसरत असताना सामाजिक अंतर राखण्यासाठी अपारंपरिक पद्धतीने पोलिसांशी समन्वय साधत ग्रामीण युवकांच्या गटाचे प्रमुख अंजार पंचानिंगत्या म्हणाले की, “आम्हाला वेगळे व्हायचे होते आणि लोकांना घराबाहेर पडू न देण्यासाठी एक प्रभावी उपाय करायचा होता.” त्यामुळेच त्यानी या भूतांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कसे आहे हे भूत?
"पोकोंग" म्हणून ओळखले जाणारे हे भुताचे रूप सामान्यत: पूर्ण चेहरा पांढऱ्या पावडरने भरलेला आणि पूर्ण शरीर पांढर्याा कपड्यात बांधलेले असतात. इंडोनेशियन लोकसाहित्यात ते मृतांच्या अडकलेल्या आत्म्यांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते. आता या केपूह गावात पोकोंगची एक टोळी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून या पूर्ण गावात गस्ती सुरु करण्यात आली आहे. ज्यात तेथील स्थानिक ग्रामसेवकांनी सुद्धा भाग घेतला आहे. जेव्हा भुतांनी मृतदेह आणला तेव्हा ग्रामस्थ घाबरून गेले. "रहिवासी कर्णो सुपॅडमो म्हणाले की," जेव्हा पोकोंग दिसू लागले, तेव्हापासून पालक व मुले आपली घरे सोडत नाहीये. आणि संध्याकाळच्या प्रार्थनानंतर लोक रस्त्यावर जमत नाहीत."

आणखी वाचा - अमेरिकेनं इटलीला टाकलं मागे; युरोपमध्ये परिस्थिती बदलत आहे!

काय म्हणाले राष्ट्रपती जोको विडोडो?
राष्ट्रपती जोको विडोडो यांनी कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊनला विरोध  केला आहे, त्याऐवजी लोकांना सामाजिक अंतर आणि चांगल्या स्वच्छतेचा सराव करण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. परंतु सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढल्याने  केपुह गाव सारख्या काही गावांनी भुतांची गस्ती, लॉकडाऊन आणि त्यांच्या गावातून बाहेर जाण्यावर बंदी असे निर्णय घेतले आहेत. कोरोनाचा संसर्ग कसा रोखता येईल याविषयी गावातील  रहिवाशांना अजूनही जागरूकता नाही," गावप्रमुख प्रियादी म्हणाले, "त्यांना नेहमीप्रमाणे जगायचं आहे म्हणून घरी राहण्याच्या सूचना पाळणं त्यांना खूप अवघड जात आहे."

आणखी वाचा - शिस्तप्रिय जपान लॉकडाऊनमध्ये कसा?

सध्या इंडोनेशियाची काय आहे स्थिती?
इंडोनेशियामध्ये सध्या कोरोनाचे ४५५७ रुग्ण असून त्यातील ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशिया विद्यापीठातील संशोधकांचा असा अंदाज आहे की मे पर्यंत १,४०,००० मृत्यू आणि १५ लाखांपेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे होऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus indonesia ghosts petrol streets village kepuh