Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतीये; ४ लाखांहून अधिक रुग्ण!

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

जगभरात 4,22,829 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद 

चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. असे असताना चीन, इटलीसह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 4,22,829 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 1,09,102 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतात आत्तापर्यंत 5५० हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सरकारे उपाययोजना करत आहेत. 

जगभरात 4,22,829 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरात 4,22,829 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये जवळपास 18,907 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,09,102 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. 

चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण

कोरोना व्हायरसची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण हे चीनचे आहेत. चीनमध्ये 81,218 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3,281 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

इटलीमध्ये 69,176 प्रकरणं समोर

इटलीमध्ये 69,176 प्रकरणं समोर आली असून, यामध्ये सुमारे 6,820 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 8,326 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. 

भारतात ५६२ प्रकरणं 

भारतात एकूण 562 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला तर ४० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Peoples Rising in World total 422829 Peoples Infected