esakal | Coronavirus इटली-चीन-कोरोना व्हायरस काय आहे कनेक्शन? इटलीची चूक काय?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus italy china connection fashion industry information marathi

जगात सध्याच्या घडीला असा एकही देश नाही, ज्याचे व्यापार संबंध चीनशी नाहीत. चीनने आपल्या लोकसंख्येचा आणि क्रमिक शक्तीचा वापर जगभरात करून घेतला आहे.

Coronavirus इटली-चीन-कोरोना व्हायरस काय आहे कनेक्शन? इटलीची चूक काय?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

रोम Coronavirus: जगात चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक बळी इटलीमध्ये गेले आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर, चीनच्या तुलनेत कोरोनाच्या बळींची संख्या इटलीत कमी असली तरी टक्केवारी जगात सर्वाधिक आहे. पण, चीननंतर इटलीतच कोरोनाचा फैलाव का झाला? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. नेमक्या कोणत्या कारणानं, चीनमधून कोरोना डायरेक्ट इटलीत पसरला आणि तोदेखील प्रचंड वेगानं? या प्रश्नामागं चीन आणि इटली यांच्यातलं व्यापार कनेक्शन जोडलंय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीननंतर इटलीतच सर्वाधिक बळी
जगात सध्याच्या घडीला असा एकही देश नाही, ज्याचे व्यापार संबंध चीनशी नाहीत. चीनने आपल्या लोकसंख्येचा आणि क्रमिक शक्तीचा वापर जगभरात करून घेतला आहे. चीनचा अफ्रिका खंडातील व्यापारी हस्तक्षेपही अनेकांना खटकतो. पण, ज्या खंडात कधी चीननं फारसा प्रवेश केला नाही. त्या युरोप खंडात गेल्या काही वर्षांत चीन मनुष्यबळाच्या निमित्तानं शिरलाय. त्यातही इटली हा देश सर्वांत आघाडीवर आहे. इटलीतील फॅशन उद्योग क्षेत्रात चीनमधून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. कमी पैशांत आणि जास्त तास काम करण्याची चीनी कामगारांची तयारी यांमुळं इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनी मनुष्यबळ आयात करण्यात आलं. इटलीच्या या चीन कनेक्शनमुळं तेथील नागरिकांचा बळी जात आहे. त्यातही बळी जाणाऱ्यांमध्ये इटलीतील वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे. 

आणखी वाचा - कोरोनामुळं तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय

उत्तर इटलीची ओळख गारमेंटसाठी 
इटलीचा उत्तर भाग हा गारमेंट आणि फॅशन इंडस्ट्रिसाठी ओळखला जातो. जगातील प्रसिद्ध गुची, प्राडा यांसारखे ब्रँड इथेच तयार होतात. चीन मनुष्यबळच नव्हे तर, सगळ्यांत स्वस्त इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देत असल्यामुळं इटलीतील बहुतांश फॅशन ब्रॅंडसनी चीनशी आपलं सहकार्य वाढवलं आहे. इटलीच्या फॅशन हाऊसमध्ये चीनमधून सगळ्यांत स्वस्त कामगार आयात करण्यात आले आहेत. इटलीच्या दुदैवानं त्याही बहुतांश कामगार हे चीनमधील कोरोनाग्रस्त वुहान शहरातील नागरिक आहेत. थोडे थोडके नव्हे तर, एक लाखावर कामगार चीनचे असल्यामुळं त्यांच्यातीलच एखाद्याकडून कोरोनानं इटलीत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. 

आणखी वाचा - इटलीत कोरोना बळींची संख्या वाढण्याचं कारणच वेगळं

वुहानहून थेट फ्लाईट 
वुहान शहरातील लाखभर मनुष्यबळ इटलीत काम करत असल्यामुळं वुहानमधून इटलीला थेट फ्लाईटची सोय आहे. इटलीत केवळ कामगाराच नव्हे तर, तेथील काही फॅशन फर्मचे मालक चीनी आहेत. त्यामुळं इटली आणि चीनमधील वुहान शहर यांच्यात रोजची लोकांची ये-जा असते. इटलीत सध्या तीन लाख चीनी नागरिक असून त्यातील 90 टक्के नागरिक हे गारमेंट इंडस्ट्रीत काम करत असल्याची बातमी नवभारत टाईम्सने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.

आणखी वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरीत व्यापाऱ्यांचा पुढाकार 

इटलीला उशिरा आली जाग
इटलीच्या प्रशासनाना कोरोनाच्या फैलावाचे गांभीर्य कळाले नाही. जेव्हा कळाले तेव्हा खूप उशीर झाला होता. त्यात इटलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या युरोप आणि जगातील इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. जवळपास 60 टक्के लोकसंख्या 40च्या वरची त्यातली 23 टक्के लोकसंख्या ही 65च्या वरची आहे. इटलीत नागरिकांचा बळी जाणे ही सगळ्यांत मोठी हानी तर झाली आहेच. पण, कोरोनाचा इटलीच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसला आहे. त्यातून इटलीला सावरायला खूप मोठा कालावधी लागणार आहे. 
 

loading image
go to top