esakal | जगाचे व्यवहार ठप्प; इटलीने मृतांच्या संख्येत चीनला टाकले मागे; आता बोलवले लष्कर
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus Italy crossed death toll compare china military action

कोरोना विषाणूने जगभरातील बहुतेक सर्व लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत, भांडवलदार-साम्यवादी देशांना झटका दिल्याने सगळीकडचेच जनजीवन विस्कळित झाले आहे.

जगाचे व्यवहार ठप्प; इटलीने मृतांच्या संख्येत चीनला टाकले मागे; आता बोलवले लष्कर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

रोम Coronavirus : जगभरातील बळींची संख्या तेरा हजारांवर गेली. आज एकट्या इटलीमध्ये एकाच दिवशी ७९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या देशात संसर्ग झालेल्यांची संख्याही आज सहा हजारांनी वाढून ५३ हजार ५७८ झाली आहे. सध्या जगात चीनपेक्षा इटलीमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती असून, लॉक डाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलंय. इटलीने लॉक डाऊनची मुदत 3 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सध्या इटलीत लोंबर्डी शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या शहरात पहिल्या टप्प्यात पोलिसांसोबत 114 जणांचे लष्कराचे पथक तैनात करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीत गंभीर स्थिती
कोरोना विषाणूने जगभरातील बहुतेक सर्व लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत, भांडवलदार-साम्यवादी देशांना झटका दिल्याने सगळीकडचेच जनजीवन विस्कळित झाले आहे. बळींच्या संख्येत चीनलाही मागे टाकणाऱ्या इटलीमध्ये आज एकाच दिवशी ७९३ जणांचा बळी गेल्याने हा देश हादरून गेला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने वाहतूक, उद्योग, शाळा, सरकारी कार्यालये यांची सेवा ठप्प झाली असून, जवळपास एक सप्तमांश लोकसंख्या घरीच अडकून पडली आहे. 
कोरोनाचा सर्वांत मोठा फटका बसलेल्या इटलीमध्ये सरकारने उशिराने का होईना, पण जागे होत अत्यावश्‍यक वर्गवारीत नसलेले सर्व उद्योग-व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू बनलेल्या इटलीमध्ये संसर्गग्रस्त रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण ८.९ टक्के आहे. इटली सरकारच्या म्हणण्यानुसार, मृतांपैकी ९८ टक्के जणांना काही ना काही आजार आधीपासूनच होता.

आणखी वाचा - कोरोनामुळं महाराष्ट्रसाठी उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

अमेरिकेलाही मोठी झळ
अमेरिकेतही एक तृतीयांश जनतेला घरी बसावे लागत आहे. आपण सर्व जण मिळून हा त्याग करत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. स्पेनमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली असून फ्रान्समध्येही बळींची संख्या साडे पाचशेच्या पुढे गेली आहे. जगभरातील शेअर बाजारांनाही फटका बसला असून अमेरिकेत उद्योग तगविण्यासाठी एक ट्रिलियन डॉलरच्या आर्थिक पॅकेजची तयारी केली जात आहे. युरोपातील सर्व देशांनी आपल्या नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. 

कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात काय घडले?

  • १३,५९४  - बळी 
  • ३५ - हून अधिक देशांमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी 
  • १ अब्ज - घरी अडकून पडलेले लोक 
  • ३,१५,७९६ - संसर्गग्रस्त लोक 
कोरोनाचा झटका बसलेले देश
देश मृतांची संख्या
इटली  4 हजार 825 
चीन  3 हजार 261 
इराण  1 हजार 685
स्पेन 1 हजार 375 
फ्रान्स  562 
अमेरिका  348 
ब्रिटन  233
नेदरलँड 136
दक्षिण कोरिया १०४ 
जर्मनी  ८४ 
loading image
go to top