कोरोनामुळं मरतो, उपाशी मारू नका; इटलीच्या लोम्बार्डीवासियांची अवस्था!

टीम ई-सकाळ
Friday, 17 April 2020

माझ्या दुकानाचे भाडे ६७ हजार रुपये आहे तसेच २९ हजार रुपयांचे वीज बिल आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे कारण अनिश्चिततेने  पोट भरत नाही.

Coronavirus जगातील कोरोनाचा कहर झालेल्या देशांपैकी इटली हा सुद्धा एक देश आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे २२,००० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील ११ हजारपेक्षा जास्त मृत्यू लोम्बार्डी प्रांतात झाले आहेत. आता या प्रांतात लॉकडाऊन हटवण्याची मागणी होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीमध्ये कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या ही १ लाख ६९ हजार वर पोहोचली असून यातील २२ हजार १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लादलेला लॉकडाऊन आता  सातव्या आठवड्यात दाखल झाला आहे. लोक अनिश्चितता, नैराश्य, अविश्वास, भीती आणि काळजी घेऊन जगत आहेत. कंपन्यांनी लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थता, नकारात्मकता आणि असुरक्षिततेचा धोका सामाजिक तणावात बदलला आहे. इथल्या लोकांनी कोरोना झाला तरी चालेल परंतु कामावर परत येण्याचा विचार केला आहे. सरकारने वित्तीय तूट भरून काढण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांना ३४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. तथापि, तोट्याच्या बाबतीत ते खूपच अपुरे आहे. सुतार काम करणारे अँटोनियो बोरगिया म्हणतात की, आम्हाला ५०,००० रुपये मदत केली आहे. माझ्या दुकानाचे भाडे ६७ हजार रुपये आहे तसेच २९ हजार रुपयांचे वीज बिल आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे कारण अनिश्चिततेने  पोट भरत नाही.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊन हटवा
आर्थिक परिस्थितीचा विचार करता देशातील सर्वात मोठी उद्योग संघटना  कॉन्फ-इंडस्ट्रीयानेही लॉकडाऊन उठविण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरवात केली आहे. या संस्थेशी दीड लाख कंपन्या संबधित आहेत आणि जवळपास ५.५ दशलक्ष कर्मचारी त्याचे सदस्य आहेत. देशातील लॉकडाऊन हटवता येईल, असे स्पष्टपणे सांगण्यास संघटनेने सरकारला सांगितले आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आर्थिक आपत्ती इटलीमध्ये निर्माण होईल.

आणखी वाचा - लॉकडाऊन संपेल, सोशल डिस्टंसिंग पाठ सोडणार नाही!

दुकाने उघडली 
लॉकडाउन हटविण्याच्या रोडमॅपवर सरकारने आता काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत कोरोनाच्या दक्षिण भागात बुक स्टोअर्स, स्टेशनरी आणि मुलांच्या कपड्यांची दुकाने उघडली आहेत. तसेच, ज्या कंपन्यांना अद्याप परवानगी नाही; त्यांना कच्चा माल वाढविण्यास, कारखाना स्वच्छ करण्यास व स्वच्छता करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाहन उद्योग, फॅशन डिझाईन आणि लोहाचा व्यवसाय प्रथम सुरू केला जाईल असे सरकारने म्हटले आहे.

आणखी वाचा - चीनमधून निघाली, कोरोना टेस्टिंग किट्स 

लोम्बार्डीमध्ये लॉकडाऊन कायम
जगातील सर्वाधिक कोरोना-प्रभावित प्रदेश लोम्बार्डी आणि आजूबाजूचे परिसर पूर्वीइतकेच लॉकडाऊन आहेत. इटलीमधील कोरोनामधून सुमारे २२ हजार मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ११ हजार लोम्बार्डीमध्येच झाले. राजधानी मिलान याच प्रदेशात येते. एरोलिया रोमाग्ना, पायडमोंट आणि व्हेनेटो या शेजारच्या भागातही कोरोनाने कहर केला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये संपूर्ण क्षेत्राचा वाटा ४५ टक्के आहे.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्यानं लागण घटली
इटलीमध्ये नवीन प्रकरणांचे प्रमाण १.७% पर्यंत पोहोचले आहे, जे आतापर्यंतचे सर्वांत कमी आहे. रोज सरासरी ३ हजार प्रकरणे येत आहेत. सर्व काही योजनेनुसार चालल्यास ३ मेपर्यंत लॉकडाऊन हटवता येईल. लॉकडाऊन संपल्यानंतर देशात नवीन संघटनात्मक मॉडेल तयार करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. ५९ वर्षीय व्हिटोरिया क्लोए या १७ -सदस्यांच्या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. यात उच्च स्तरीय वकील, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर आहेत. ही टीम वैज्ञानिक तांत्रिक समितीबरोबर यांवर काम  करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus italy lombardy city lockdown situation