ऑलिम्पिकच्या तयारीत रमलेल्या जपानमध्ये धोका वाढला; कोरोनाग्रस्त 9 हजारांवर​

टीम ई-सकाळ
Friday, 17 April 2020

टोकियो, क्योडो, ह्योगो, फुकुओका यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रांताची ही परिस्थिती आहे.

Coronavirus Japan : जपानमध्ये पहिला कोरोना रुग्ण जानेवारीत जरी सापडला असला तरी, जपान सरकारने वेळीच योग्य पाऊल न उचलता तब्बल ८३ दिवसांनंतर आणीबाणी जाहीर केली. आता याचमुळे जपानमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार २३१ च्या पुढे पोहचला असून त्यात १९० लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जपान सरकारला कोरोनाच्या इतक्या भयंकर रोगावर इतक्या उशिरा जाग आल्याने तेथील नागरिक संतप्त आहेत. जपानमध्ये संक्रमणाचा आकडा ९२३१ च्या पुढे पोहचला असून त्यात १९० लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानची राजधानी असलेल्या एकट्या टोक्यो मध्ये २६०० पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. २७ फेब्रुवारीला पंतप्रधान शिंजो आबे यांनी संपूर्ण जपानमधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी चीनच्या वूहान प्रांतातून निघालेले प्रिन्सेस डायमंड जहाज जपानमध्ये थांबविण्यात आले होते. व याच जहाजावरील तब्बल ७०० लोकांना कोरोनाची लागण झाली होती. जपानमध्ये पहिला रुग्ण हा जानेवारीत सापडला होता आणि त्यानंतर तब्बल ८३ दिवसांनी जपान सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. जपानमधील नऊ प्रांतातील हॉस्पिटलमध्ये बेड्स संपत आले आहेत.

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एनएचकेच्या म्हणण्यानुसार देशातील नऊ प्रांतातील रुग्णालयांमधील कोरोनासाठी असलेली अत्यावश्यक बेड्स संपणार आहेत. टोकियो, क्योडो, ह्योगो, फुकुओका यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रांताची ही परिस्थिती आहे. जपानमधील दुसरे मोठे शहर ओसाका येथील स्थानिक प्रशासनाने आरोग्य कर्मचार्यांना सेफ्टी किट नसल्यामुळे लोकांना रेनकोट दान करण्यास सांगितले आहे. ओसाकाच्या महापौरांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील इतर शहरांमधील डॉक्टर आणि परिचारिका बीनच्या पिशव्या घालून उपचार करत आहेत.

आणखी वाचा - प्लाझ्मा देण्यासाठी अमेरिकेत लागल्या रांगा

संपूर्ण लक्ष ऑलिम्पिक स्पर्धेवर
क्योटोच्या दोशिशा विद्यापीठाचे अर्थशास्त्रचे प्राध्यापक नॅरिको हमा म्हणतात की, “हे या धोक्याबद्दल सरकार किती गंभीर आहे हे दर्शवते. त्यांना काय करावे हे माहित नाही. चुकण्याच्या भीतीने त्यांनी कोणतीही निर्णायक कारवाई केली नाही. सामान्य लोक आर्थिक पेचात जगत आहेत, त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. छोट्या उद्योजकांचीही अशीच परिस्थिती आहे. लोकांमध्ये असंतोष आहे की सरकारचे संपूर्ण लक्ष ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनावरच राहिले. जुलैपर्यंत सरकार हे खेळ घेण्यास तयार होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने उन्हाळी व पॅराऑलिम्पिक स्पर्धा रद्द केल्यावर जपान सरकारतर्फे  आणीबाणीची घोषणा करण्यात आली.”

आणखी वाचा - कोरोनामुळं मरू; उपाशी मारू नका; इटलीतील नागरिकांची अवस्था

सरकारने मदत जाहीर केली नाही
जपान सरकारकडून व्यवसायात देखील फक्त अशाच लोकांना मदत केली जात आहे जे सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थन करतात. हमा म्हणतात की जर लोक यावर राग व्यक्त नाही करणार तर ते आणखी काय करतील. टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी २० वर्षीय इसेई इजावा म्हणाली की “माझ्यासारखे बरेच विद्यार्थी अस्वस्थ आहेत. या महिन्याच्या शेवटी फी जमा करावी लागेल. मात्र, सरकारने अद्याप यात सवलत जाहीर केलेली नाही. आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही.”

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑलिम्पिक रद्द करण्याची इच्छा नव्हती
डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी नेते आणि टोकियोच्या वासेदा विद्यापीठातील प्राध्यापक मेको नाकाबयाशी यांचे म्हणणे आहे की, “देशात नेतृत्त्वाची स्पष्ट कमकुवतता आहे. सरकार ऑलिम्पिक स्पर्धा धोक्यात घालण्यास तयार नव्हते. कारण त्यांची आणि बर्यारच व्यवसायांची प्रतिष्ठा धोक्यात होती. हे वाचवण्यासाठी देशातील लोकांवर दुर्लक्ष केले गेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus japan cases jumped daily rise increasing