कोरोनाला काय घाबरायचं? युरोपमधल्या देशात सुरू होणार कारखाने

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

जगभरात वेगाने संक्रमण होणाऱ्या कोरोना व्हायरसचा युरोपीय राष्ट्रांना मोठा फटका बसला आहे. इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्ये कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. 

जगभरात वेगाने संक्रमण होणाऱ्या कोरोना व्हायरसचा युरोपीय राष्ट्रांना मोठा फटका बसला आहे. इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्ये कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. जागतिक साथीच्या रोगाच्या माऱ्यात सर्वाधिक बळी गेलेल्या युरोप आता जागतिक संकटातून सावरत आहे. मागील तीन आठवड्यातून युरोपातील वेगाने होणारे संक्रमण नियंत्रित दिसत आहे. मृतांचा तसेच कोरोनाची लागण झालेला आकड्याचे प्रमाणही नियंत्रणात येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही स्पॅनिश कंपन्यांनी सोमवारपासून पुन्हा उद्योगाला नव्याने उभारी देण्याला सुरुवात केल्याचे वृत्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पॅनिश पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. दोन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊननंतर देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाची गती मंदावली. त्यामुळेच काही स्पॅनिश कंपन्या पुन्हा नव्याने कामाला लागल्याचे दिसते.

आणखी वाचा - सोशल डिस्टंसिंग जर्मनीकडून शिका!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्पॅनिश पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांनी देशात कठोर निर्बंध लागू केले होते. देशात आणीबाणीची स्थिती असून दोन आठवड्यांचा लॉकडाऊनचा काळ हा आर्थिक हायबर्नेशनचा कालावधी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. स्पॅनिश कंपन्याचे शटर उघडल्यानंतर इटलीमध्येही ठप्प झालेला व्यवसाय सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. सध्याच्या घडीला सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्यायाचा अवलंब करुन या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न जगभरात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवीर भारतासह जगभरातील अनेक राष्ट्रांची लॉकडाऊन हीच कोरोनाविरोधातील लढ्याची प्रमुख रणनिती आहे. कोरोनाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर आर्थिक संकटही गडद होत आहे. कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येक देशासमोर मोठे आव्हान असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown Spanish companies will resume operations 

Tags
टॉपिकस
Topic Tags: