न्यूयॉर्कमध्ये मृतदेहांचा खच; सामूहिक दफनविधीसाठी शोधावी लागते जागा

टीम ई-सकाळ
Saturday, 11 April 2020

एकट्या न्यूयॉर्क राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले एकून १ लाख ६२ हजार पेक्षा जास्त रुग्ण असून, यामध्ये ७ हजार ८४४ नागरिकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे.

न्यूयॉर्क Coronavirus : जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वांत जास्त रुग्ण असलेले राज्य आता न्यूयॉर्क आहे. न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा सुद्धा याच प्रमाणात वाढत आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून यात सर्वात जास्त त्याचा हाहाकार न्यूयॉर्कमध्ये झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील एकट्या न्यूयॉर्क राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले एकून १ लाख ६२ हजार पेक्षा जास्त रुग्ण असून, यामध्ये ७ हजार ८४४ नागरिकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे १ लाख ५७ हजार रुग्ण असून त्यापाठोपाठ इटलीमध्ये १ लाख ४३ हजार ६०० रुग्ण आहेत. अमेरिकेत कोरोनाचे एकूण ४लाख ६७हजार रुग्ण असून, त्यातील १६ हजार ७०० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १६ लाखांपेक्षा पुढे गेला असून त्यातील ९७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे.

आणखी वाचा - भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे, मृतांचा आकडा

आणखी वाचा - लॉकडाऊन वाढला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

काय आहे न्यूयॉर्कची स्थिती?
न्यूयॉर्कमध्ये दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर फक्त रुग्णवाहिकेचा आवाज एकू येत असून येथील प्रत्येक रूग्णालयाबाहेर फ्रीज असलेल्या ट्रकमध्ये मृतदेहांचा खच पाहायला मिळत आहे. अपुऱ्या असणाऱ्या दफनविधी क्षमतेमुळे शहरातील दफनभूमीत फक्त काहीच प्रमाणात दफनविधी केले जात आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्या आधी शहरातील प्रत्येक दफनभूमीमध्ये आठवड्यात फक्त एक दिवस दफनविधी होत असून, त्याचा आकडा सरासरी २५ इतका होता. आता कोरोनामुळे वाढलेल्या मृतांचा आकडा लक्षात घेता आठवड्यातील पाच दिवस दफनविधी होत असून दररोज २३ ते २५ मृतदेहांवर दफनविधी पार पडत असून, दफन करायचे काम आता कंत्राटीपद्धतीने देण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक अधिकारी जेसन क्रेस्टन यांनी पत्रकारांना दिली आहे.

आणखी वाचा - लॉकडाऊनमध्ये रेशनिंगसाठी हेल्पलाईननंबर वापरा

मृतदेहावर कसे केले जाणार दफनविधी?
न्यूयॉर्कमधील मधील मृत्यूचा दर पाहता तेथे आता सामुहिकरित्या दफन करण्याचा विचार केला जात आहे. न्यूयॉर्कमध्ये आता सरासरी दररोज ७८० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. याआधीच व्हाईट हाऊसकडून अमेरिकेत कोरोनामुळे एकून २.२५ लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज लावण्यात आला आहे. अशातच सामुहिक दफनविधी हाच एक पर्याय न्यूयॉर्क शहरासाठी योग्य असल्याचे सध्या दिसत आहे. यामध्ये ज्या कुटुंबाना अंत्यविधीचा खर्च परवडणार नाही अश्या लोकांचे मृतदेह दफन करण्यास सुरवात करण्यात आली आहे. या संदर्भात हार्ट आईसलंड मधून व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या दफनभूमीमध्ये आता दफन होणे शक्य नसल्याने असा पर्याय निवडण्यात आलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus New York deaths bodies buried hart island