पाकिस्तानात मौलवी वाढवतायत डोकेदुखी

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

संसर्ग रोखण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. मात्र, सध्याच्या काळात मशिदींमध्ये नमाज पढण्यासाठी नागरिकांना बोलावू नये, असे मौलवींना सांगण्यात सरकारी अधिकाऱ्यांची शक्ती खर्च होत आहे.

इस्लामाबाद Coronavirus : मशिदींसह कोणत्याही प्रार्थनास्थळांवर अथवा कोठेही नागरिकांनी न जमण्याचे आदेश असतानाही पाकिस्तानमध्ये अनेक मौलवी नागरिकांना गोळा करत असल्याने येथील सरकार त्रस्त झाले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या मौलवींवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान इम्रान खान सरकारसमोर आहे. पाकिस्तानमध्ये रुग्णांची संख्या साडे सात हजार झाली असून, आतापर्यंत दीडशे जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धार्मिक नेत्यांना विश्वासात घेणार!
संसर्ग रोखण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. मात्र, सध्याच्या काळात मशिदींमध्ये नमाज पढण्यासाठी नागरिकांना बोलावू नये, असे मौलवींना सांगण्यात सरकारी अधिकाऱ्यांची शक्ती खर्च होत आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी आज देशातील प्रमुख मुस्लिम नेते आणि मौलवींशी याबाबत चर्चा केली. पंतप्रधान इम्रान खानही लवकरच धार्मिक नेत्यांशी चर्चा करून त्यांना विश्‍वासात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही गट सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत असले तरी काही जण मात्र सरकारी हस्तक्षेपाच्या विरोधात आहेत. मशिद सुरू करायची की नाही, याचा निर्णय मौलवींनी घ्यावा, सरकारने नाही, अशी भूमिका ते घेत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढत आहे. राजधानी इस्लामाबादमध्येच असलेल्या प्रसिद्ध लाल मशिदीतच दर शुक्रवारी मोठ्या संख्येने लोक नमाज पढण्यासाठी जमत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी वाचा - कोरोनामुळं नव्हे, या कारणानं आहेत पोलिस हैराण!

अमेरिका पाकिस्तानवर मेहेरबान
जगातील सर्वांत मोठे कोरोना संकट सध्या अमेरिकेवर आहे. पण, अमेरिकेने अनेक देशांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदत देऊ केली आहे. अमेरिकेने भारताला 59 लाख डॉलरची मदत केली. तर, पाकिस्तानला 94 लाख डॉलरची मदत केली आहे. मुळात पाकिस्तानात कोरोनाचा धोका असूनही, लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या साडे सात हजारहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. परंतु, व्यवहार सुरू राहिले नाहीत तर, पाकिस्तानातील जनतेचा जगण्याचा प्रश्न उद्भवू शकतो म्हणूनच पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला नसल्याचं स्वतः पाकचे पंतप्रधान इरमान खान यांनी स्पष्ट केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pakistan moulavi responsible for gathering pm imran khan