Coronavirus : काळजी घ्या! मास्कवर कोरोना व्हायरस राहतो आठवडाभर

वृत्तसंस्था
Tuesday, 7 April 2020

हाँगकाँगच्या संशोधकांकडून अभ्यास

- नोटांवर चार दिवस राहतो व्हायरस

हाँगकाँग : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, आपण वापरत असलेल्या मास्कवर कोरोना व्हायरस ८ दिवसांपर्यंत सक्रिय राहू शकतो, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध उपचार पद्धतींचा वापर केला जात आहे. त्यातच आता मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण हा मास्क वापरताना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण कोरोना व्हायरस हा मास्कच्या बाहेरील बाजूस जवळपास एक आठवडा सक्रीय राहतो. इतकेच नाही तर चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टिकवर तर कोरोना व्हायरस अनेक दिवस सक्रीय राहू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. 

Coronavirus pandemic

हाँगकाँगच्या संशोधकांकडून अभ्यास

कोरोना व्हायसरबाबत हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे, अशी माहिती हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टकडून देण्यात आली आहे. यामध्ये तापमानानुसारही अभ्यास करण्यात आला. कोरोना व्हायरस कुठं आणि कोणत्या तापमानात सक्रिय राहू शकतो, याची माहिती घेण्यात आली आहे. 

अभ्यासातून बाब समोर

कोरोना व्हायरससंदर्भात तज्ज्ञांकडून अभ्यास केला जात आहे. या अभ्यासातूनच ही माहिती समोर आली आहे. मात्र, घरातील ब्लिच आणि साबणाने सातत्याने हात धुतल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.  

coronavirus cases

नोटांवर चार दिवस राहतो व्हायरस

संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून विविध महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये कोरोना व्हायरस लाकडावर आणि कपड्यांवर एक दिवस सक्रीय राहतो. तर काच आणि चलनी नोटांवर हा व्हायरस चार दिवसांपर्यंत सक्रीय राहू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Remains Active on Mask for A Week