अमेरिकेच्या आरोपानंतर रशिया आता चीनच्या बाजूने 

टीम ई-सकाळ
Friday, 17 April 2020

कोरोनाच्या साथीबाबत जगाला माहिती देण्यास चीनकडून उशीर झाल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

मॉस्को Coronavrius : कोरोनाच्या विषाणूच्या उद्रेकाबाबत जगाला माहिती देण्यास चीनकडून विलंब झाल्याचे आरोप चीनचे अध्यक्ष शी जिनपींग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळून लावले. आरोप-प्रत्यारोपांमध्ये रशिया चीनच्या बाजूनं उभा राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. एका बाजूनला चीन-रशिया आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका-ब्रिटन अशी परिस्थिती आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण, ही चीनच्या वुहान शहरातील लॅबमधून झाल्याचा संशय अमेरिकेनं व्यक्त केलाय. यापूर्वी ब्रिटननं हाच संशय व्यक्त केला होता. त्यासाठी ब्रिटननं आपली गुप्तचर यंत्रणाही कामाला लावली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले चीन-रशियात?
कोरोनाच्या साथीबाबत जगाला माहिती देण्यास चीनकडून उशीर झाल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष जिनपींग आणि पुतीन यांच्यात गुरुवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेवेळी अमेरिकेचे आरोप दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावले असल्याची माहिती ‘क्रेमलीन’कडून देण्यात आली. कोरोनाच्या विषाणूचा उगम वुहानमधील प्रयोगशाळेतून झाल्याच्या शक्यतेची आम्ही पडताळणी करत असून, या बाबत सखोल चौकशी करण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. कोरोनामुळे जगभरात एक लाख ७०० जणांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी चीनकडून उचलण्यात आलेल्या पावलांचे पुतीन यांनी या वेळी कौतुक केले. अमेरिकेचे थेट नाव न घेता चीन वर होणारे आरोप दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावल्याचे ‘क्रेमलीन’ने म्हटले आहे. सध्याच्या संकटाच्या काळात चीन आणि रशिया परस्परांना सहकार्य करण्यास तयार असून, विविध पातळ्यांवर एकमेकांना मदत केली जाईल. या संकटावर दोन्ही देश यशस्वीपणे मात करतील, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. 

आणखी वाचा - ऑलम्पिकच्या तयारीत रमलेल्या जपानमध्ये धोका वाढला

आणखी वाचा - कोरोनानं मरतो पण, उपाशी मारू नका!

चीनला कठीण प्रश्न विचारणार : ब्रिटन 
लंडन : कोरोनाच्या विषाणूचा उगम नेमका कसा झाला, या विषाणूचा संसर्ग सुरवातीलाच का रोखण्यात आला नाही, असे सवाल ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी आज उपस्थित केले. तसेच, कोरोनाच्या उद्रेकाबाबत चीनला ब्रिटन आणि मित्र देशांकडून कठीण प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरेही चीनला द्यावी लागतील, असेही राब म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकानंतरच्या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आता चीनबरोबर पूर्वीप्रमाणे संबंध असणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राब यांनी वरील वक्तव्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus russia china denied aaligation from usa