Coronavirus : स्पेनमध्ये एका दिवसात जवळपास कोरोनाचे ७०० बळी

वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना काल (ता. २६) एका दिवसात स्पेनमध्ये जवळपास कोरोनामुळे ७०० लोकांचा बळी गेला आहे. आता स्पेनमधील बळीची संख्या चीनहूनही अधिक झाली असून, तो आता इटलीनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना काल (ता. २६) एका दिवसात स्पेनमध्ये जवळपास कोरोनामुळे ७०० लोकांचा बळी गेला आहे.  आता स्पेनमधील बळीची संख्या चीनहूनही अधिक झाली असून, तो आता इटलीनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पेनमध्ये एकाच दिवसात जवळपास ७०० हून अधिक बळी गेल्याने तेथील मृत्यूसंख्या ३ हजार ४३४ झाली आहे. ३२८५ बळी गेलेल्या चीनला स्पेनने मागे टाकले आहे, असे तेथील आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. त्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० टक्क्य़ांनी वाढून ४७,६१० झाली असून, ५ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे स्पेनच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा दबाव आला असून, हॉटेल्सचे रूपांतर रुग्णालयांत करण्यात येत आहे, तर बर्फाच्या एका स्केटिंग रिंकचा शवागासारखा वापर करण्यात येत आहे. स्पेनमधील  संचारबंदी १२ एप्रिलपर्यंत वाढवण्याची तेथिल सरकारने केली आहे.

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा ! 

दरम्यान,  ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ब्रिटिश राजघराण्याचे वारस असलेले ७१ वर्षांचे प्रिन्स चार्ल्स यांच्यात कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांनी स्कॉटलंडमधील राजघराण्याच्या एका वास्तूत स्वत:ला विलग केले असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. त्यांची चाचणी सकारात्मक आली असली तरी त्यांची पत्नी कामिला यांची चाचणी नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus Seven Hundred Victims in one Day in Spain

टॅग्स
टॉपिकस