आश्चर्यच! सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोना होत नाही? संशोधक म्हणतात...

पीटीआय
Saturday, 25 April 2020

४८० रुग्णांचे सर्वेक्षण...

  • कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या ४८० रुग्णांचे सर्वेक्षण
  • रुग्णालयात दाखल करावे लागले त्या रुग्णांचे सरासरी वय ६५
  • यात नियमीत धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.४ टक्के
  • फ्रान्समधील धुम्रपानाची आकडेवारी ः ४४ ते ५३ वयोगटात ४०, तर ६५ ते ७५ वयोगटात ८.८ ते ११.३ टक्के
  • पॅरीसमधील रुग्णांच्या अभ्यासामुळे निकोटीन पॅचच्या प्रयोगाचा विचार
  • ११ हजार रुग्णांमध्ये धुम्रपान करणाऱ्यांची टक्केवारी ८.५
  • फ्रान्समधील एकूण लोकसंख्येत धुम्रपानाचे प्रमाण २५.४ टक्के

पॅरीस - धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळाल्यामुळे फ्रान्समधील संशोधक निकोटीन पॅचचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. काट्याने काटा काढायचा हा यामागील उद्देश आहे.

पॅरीसमधील रुग्णालयात नव्या संदर्भाने अभ्यास करण्यात आला. त्यातून वैद्यकीय कर्मचारी, रुग्णांवर निकोटीन पॅचचा वापर करण्यात यावा असे सुचविण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावधानतेचा इशारा
अभ्यासातील निरीक्षणे नोंदविण्याआधीच या संशोधकांनी धुम्रपान सुरू करू नये असा सावधानतेचा इशारा दिला. आमच्या पथकाला धुम्रपानास प्रोत्साहन द्यायचे नाही. कारण त्यामुळे निकोटीन घेणारे ५० टक्के लोक जीव गमावतात. तंबाखूच्या धुराच्या विषारी परिणामांमुळे कोरोनाची लक्षणे गंभीर बनतात, असेही बजावण्यात आले. निकोटीन पॅच वापरल्यास संसर्ग वाढण्याचा धोका चालू-फिरू शकणाऱ्या रुग्णांसाठी पाच टक्याने, तर रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी चार टक्याने घटू शकतो. असे प्रायोगिक औषधांत अपवादाने पाहायला मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus smoking research france information marathi