लॉकडाऊन संपला तरी, सोशल डिस्टंसिंग काही पाठ सोडणार नाही!

टीम ई-सकाळ
Thursday, 16 April 2020

हावर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासावर नुकतेच सायन्स जर्नल प्रसिद्ध करण्यात आले आहे कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी अजून दोन वर्षे म्हणजेच २०२२ पर्यंत सोशल डीस्टंसिंग पाळावे लागणार आहे.

अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासावर नुकतेच सायन्स जर्नल प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यातील मांडण्यात आलेल्या संशोधनानुसार फक्त लॉकडाऊन एकदा करून नाही तर कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी अजून दोन वर्षे म्हणजेच २०२२ पर्यंत सोशल डीस्टंसिंग पाळावे लागणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरु असून जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या लॉकडाऊन सोबतच संपूर्ण जग सोशल डीस्टंसिंगचे पालन करत आहे. अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार संपूर्ण जगाला अजून दोन वर्षे म्हणजेच २०२२ पर्यंत सोशल डीस्टंसिंग पाळावे लागणार आहे. या शास्त्रज्ञांच्यामते सध्या घेण्यात आलेला लॉकडाऊन हा या कोरोनाच्या विरुद्ध लढाईतील पहिला टप्पा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा लॉकडाऊन हटवण्यात येऊ शकतो आणि सांगून दिलेल्या नियमांवर दुर्लक्ष केले जाऊ शकते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा सक्रीय होऊन कोट्यावधी लोक त्यामुळे संक्रमित होऊ शकतात. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा अभ्यास नुकताच सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना अशी भीती आहे की जर या नियमांवर दुर्लक्ष केल्यास हा कोरोना अधिक जीवघेणा ठरू शकतो.

इतके वर्ष पाळावे लागणार सोशल डिस्टन्सिंग; अन्यथा पुन्हा साथ येणार..

सार्समध्येही असेच घडले?
संशोधकांनी कंप्युटिंग मॉडेल्सद्वारे असे नमूद केले आहे की, जेव्हा सोशल डीस्टंसिंगचे कठोर पालन करण्यात येईल तेव्हाच ह्या संसर्गजन्य विषाणूचा पुन्हा प्रसार होण्यापासून रोखता येईल. २००३ मध्येही  सार्सओव्ही-१  प्रसंगामध्येही असेच परिणाम दिसले होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा विषाणू इन्फ्लूएन्झा म्हणून जगभर पसरला आहे. या आधारावर सद्यस्थितीमध्ये कमीत कमी २०  आठवड्यांसाठी म्हणजे १४० दिवस सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

लस तयार होईपर्यंत दुर्लक्ष करता येत नाही
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोनामुळे वाईट रीतीने प्रभावित झालेल्या अमेरिकेला सन २०२२ पर्यंत किंवा त्याची लस तयार होई पर्यंत सोशल डीस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. जगातील इतर देशांनाही याकडे लक्ष द्यावे लागेल कारण जगभरातील शास्त्रज्ञांना ही लस तयार करण्यात अजूनही यश मिळत नाही. त्यामुळेच या विषाणूला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांत कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus social distancing harvard university report marathi

Tags
टॉपिकस
Topic Tags: