कोरोनाग्रस्त महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

सोलमधील ही कोरोनाग्रस्त महिला सर्व ठिकाणी फिरत राहिली. तिच्यामुळे तब्बल ५ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर तिच्यामुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. तिची ओळख न पटल्यामुळे हा भयानक प्रकार घडल्याचे समजते. या महिलेवर सरकारने हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिच्यामुळे ज्यांना कोरोना झाला त्या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

सोल : कोरोना व्हायरसने जगभरात थैमन घेतलेले असतानाच अनेक देश अगदी मजबूतीने मुकाबला करत आहेत. डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी घेषित केलेले असतानाच जगभरातील लॅब्समध्ये यावरील लस शोधण्याचे काम सुरू आहे. कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी संचारबंदी, लॉकडाऊन सारखी खबरदारी घेत असतानाच दक्षिण कोरियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मुलीमुळे हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 

दक्षिण कोरियातील संशोधकांनी एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. एका महिलेच्या दुर्लक्षामुळे दक्षिण कोरियातील हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे या संशोधकांनी सांगितले आहे. ही कोरोनाग्रस्त महिला दक्षिण कोरियातील शेंचेनजी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेली होती. त्यानंतर तिचा लहानसा अपघात झाला, त्यामुळे ती महिला रूग्णालयात दाखल झाली. त्यावेळी तिला कोरोनाची लक्षणं जाणवली होती, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तिला डिस्चार्ज मिळाला. मात्र, या रूग्णालयातील ११९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे घडला. 

सोलमधील ही कोरोनाग्रस्त महिला सर्व ठिकाणी फिरत राहिली. तिच्यामुळे तब्बल ५ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर तिच्यामुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. तिची ओळख न पटल्यामुळे हा भयानक प्रकार घडल्याचे समजते. या महिलेवर सरकारने हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिच्यामुळे ज्यांना कोरोना झाला त्या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

जगभरात कोरोनामुळे १६ हजारहून जास्त बळी गेले आहेत. तर भारतातील बळींची संख्या नऊवर पोहोचली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनामुळे तीन मृत्यू झाले आहेत. भारत कोरोनाविरोधात अविरतपणे लढत आहेत. त्यासाठी देशातील ३० राज्ये लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तर सोलमध्ये घडला तसा प्रकार भारतात घडू नये साठी लोकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus South Korea women hit from outbreak case filed