चीन सुधारणार नाही; स्पेनमध्ये सापडली निकृष्ट टेस्टिंग किट्स

टीम ई-सकाळ
रविवार, 29 मार्च 2020

सध्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव युरोपमध्ये आहे. जगातील इतर देशांप्रमाणं युरोपमध्येही कोरोनाचं निदान करण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत आहे.

मद्रिद (Spain Coronavirus):कोरोना व्हायरसचा चीनमधून जगभरात झालेला फैलाव आणि त्यानंतर चीननं कोरोनाग्रस्त देशांना मदतीसाठी पुढे केलेला हात, यावर जगभरातून शंका उपस्थित केली जात आहे. आता तर, चीनच्या एकूण भूमिकेविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे. युरोपमधील देशांना चीनने वैद्यकीय मदत म्हणून पाठवलेली टेस्टिंग किट्स निकृष्ट असल्याचं स्पष्ट झालंय. स्पेन आणि चेकप्रजासत्ताक यांनी त्याचा वापर थांबवलाय.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे प्रकरण?
सध्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव युरोपमध्ये आहे. जगातील इतर देशांप्रमाणं युरोपमध्येही कोरोनाचं निदान करण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत चीनने युरोपमधील देशांसाठी मदतीचा हात पुढे केले. स्पेन, इटली, यांसारख्या देशांना चीनने मास्क, इतर वैद्यकीय साहित्य आणि टेस्टिंग किट्स पाठवली आहेत. त्यात स्पेनला पाठवण्यात आलेली टेस्टिंग किट्स निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्पेन सरकारनं केलंय. या किटचा वापर केल्यानंतर रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची खात्री होण्याची शक्यता केवळ 30 टक्केच आहे. टेस्टिंग किटमधून स्पेनने चीनकडून 432 मिलियन युरो किमतीचे वैद्यकीय साहित्य खरेदी केले आहे. त्यात मास्क आणि ग्लोव्जपासून टेस्टिंग किट्सचा समावेश आहे. 

आणखी वाचा - ब्रिटनमध्ये जूनपर्यंत लांबणार संचारबंदी!

चीनचे किट्स वापरणार नाही!
स्पेनच्या आरोग्य खात्याने चीनमध्ये तयार करण्यात आलेली ही टेस्टिंग किट्स न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अशा किटची स्पेनमधील संख्या 58 हजार आहे. यावर चीन सरकारनं खुलासा केला आहे. स्पेनमधील ही टेस्टिंग किट्स अधिकृत उत्पादक नसलेल्या कंपनीने तयार केल्याचं चीननं म्हटलंय. स्पेननं ही टेस्टिंग किट्स परत करण्याचा निर्णय घेतला असला तरी, ही किट्स थेट चीनमधून आयात केली नसल्याचं सांगितलंय. स्पेनमधीलच एक पुरवठादार कंपनीकडून ही किट्स खरेदी करण्यात आली होती. ती किट्स कंपनीने चीनमधील एका कंपनीकडून खरेदी केली होती. 

आणखी वाचा - स्पेनमध्ये 24 तासांत सर्वाधिक मृत्यू; लॉकडाऊनचे नियम बदलले

निकृष्ट किट्स आलीच कशी?
मुळात स्पेन हा युरोपीय महासंघाचा एक भाग आहे. महासंघाचे सर्व नियम, निकष पाळणारा हा देश आहे. स्पेनमध्ये किंवा युरोपमध्ये आयात करण्यापूर्वी महासंघाच्या निकाषांनुसार त्या उत्पादनाला प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतरच ते उत्पादन आयात केले जाते. त्यामुळं त्या टेस्टिंग किट्ससाठीही सर्व निकष, नियम लागले असणार तरीदेखील ही किट्स स्पेनमध्ये कशी आली? याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर स्पेनने चीनकडून ज्या आरोग्य साहित्याची खरेदी केली होती. त्या साहित्यातून ही निकृष्ट किट आलेली नसल्याचं स्पेनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus spain withdrawn chinese test kits poor accuracy