Coronavirus : स्पेनच्या उपपंतप्रधानांसह पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून कोरोना विषाणूंचा युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. अशातच आता स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेल कॅल्वो यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कॅल्वो यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. त्यांचीही चाचणी सकारात्मक आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मद्रिद : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून कोरोना विषाणूंचा युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. अशातच आता स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेल कॅल्वो यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कॅल्वो यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. त्यांचीही चाचणी सकारात्मक आल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युरोपमधील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांना करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्पेनमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या चार हजारांहून अधिक झाली आहे. तर संसर्ग झालेल्या रुग्णांची स्पेनमधील संख्या ५६ हजारहून अधिक आहे. अशातच स्पेनच्या उपपंतप्रधानांना कोरोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

कॅल्वो यांची पहिली करोना चाचणी मंगळवारी घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना करोना झाल्याचे अढळून आलं नाही. त्यांनंतर बुधवारी घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीमध्ये त्यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले असून त्यांची चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांच्यात कोरोनाची सूक्ष्म लक्षणं दिसून आली आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा ! 

स्पेन सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅल्वो यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे सध्या ६२ वर्षे वय आहे. दरम्यान, स्पेनमध्ये मागील २४ तासांमध्ये ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या ५६ हजारांच्या पुढे आहे. मागील तीन आठवड्यांपासून स्पेनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने झाला आहे. त्यामुळेच मागील तीन आठवड्यांपासून इटलीपाठोपाठ स्पेननेही प्रवासबंदीसह अन्य कठोर निर्बंध जारी केले. स्पेनमध्ये १५ मार्च रोजी दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली. दरम्यान, जानेवारीत स्पेनमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. आता संपूर्ण स्पेन कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus: Spains Deputy PM Carmen Calvo tests positive