अमेरिकेत कोरोनाचे थैमान; डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून  अमेरिकेला कोरोनाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत जवळपास २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगाचं अर्थचक्र हे अमेरिकेच्या भरवश्यावर सुरू असतं. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याचे स्पष्ट संकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अमेरिकेला कोरोनाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत जवळपास २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगाचं अर्थचक्र हे अमेरिकेच्या भरवश्यावर सुरू असतं. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याचे स्पष्ट संकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी दोन टास्क फोर्स स्थापन केले आहेत. यात एक गट हा तज्ज्ञ डॉक्टरांचा तर दुसरा गट हा अर्थतज्ज्ञांचा आहे. डॉक्टरांच्या गटाने त्यांना अर्थव्यवस्था पुन्हा खुली करू नये असा सल्ला दिलाय तर आर्थिक गटाने त्यांना अर्थव्यस्था पुन्हा खुली करावी असा सल्ला दिला. त्यामुळे ते कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Coronavirus : एलआयसीकडूनही हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ

काल (ता. १२) शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की मी लवकरच सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याच्या संदर्भात ते बोलत होते. तुम्ही कुठल्या गणिताच्या आधारे हे बोलत आहात असं जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले, मी सगळ्यांचं ऐकतो पण शेवटी निर्णय माझ्या विचारांप्रमाणे घेतो. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्थ गर्तेत आहे. मनुष्यहानी आणि वित्तहानी या दोनमधून त्यांना निवड करायची आहे. जे सर्वाधिक कमी नुकसान करणारं असेल तो पर्याय ते निवडतील असं बोललं जात आहे.

Coronavirus : अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; बळींचा उच्चांक

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारामुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. दुसरीकडे या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप ठोस लस सापडलेली नाही. तत्पूर्वी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकरणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट यांनी दावा केला आहे की, तिची टीम लवकरच कोरोना विषाणूची लस तयार करेल. सारा यांनी येत्या 15 दिवसांत कोरोना विषाणूची लस चाचणी करणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus : Trump faces biggest decision on economy