अमेरिकेसाठी 'त्या' पार्ट्या ठरल्या कर्दनकाळ!

पीटीआय
Monday, 13 April 2020

फॉलोअर्स नाहीत म्हणून ...
कोरोनाची खिल्ली उडविण्यासाठी टिकटॉक चॅलेंज सुरू करण्यात आले. त्यात लार्झ नामक युझरने कमोडचे सीट चाटत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. नंतर एका चॅट शोमध्ये त्याने सांगितले की, मी माझ्या आईशी बोलत नाही, कारण सोशल मीडियावर तिला जास्त फॉलोअर्स नाहीत. त्यानंतर लार्झवर बरीच टीका झाली. हाच लार्झ आता रुग्णालयात दाखल आहे.

न्यूयॉर्क - चीन आणि इटलीच्या तुलनेत साथ उशिरा पसरूनही अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. आता यास कारणीभूत ठरलेल्या असंख्य अमेरिकी नागरिकांना पश्चात्ताप होत आहे. सध्या अमेरिकेत पाच लाखांवर नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, 22 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा यात बळी गेलाय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची साथ पसरत असण्याच्या सुमारासच वसंत ऋतूचे आगमन झाले. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पार्टी करण्याची मोठी परंपरा असल्यामुळे अनेक जण सज्ज होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. हे करताना इतके टोक गाठण्यात आले की, कोरोनाव्हायरस चॅलेंज अशी मोहीमच पुकारण्यात आली. त्यात कमोडचे सीट चाटणे, ग्रोसरी स्टोअरमध्ये मुद्दाम शिंकणे अशी कृत्ये करण्याचा सपाटाच सुरु झाला.

टॅम्पा विद्यापीठाच्या ब्रॅडी स्लु़डर नामक विद्यार्थ्याची प्रतिक्रिया प्रातिनिधिक ठरली. सीबीएस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना त्याने पार्टीचे समर्थन केले. त्यावेळी तो म्हणाला की, मला कोरोना झाला तर झाला, शेवटी मला पार्टी करण्यापासून हा कोरोना अजिबात रोखू शकणार नाही. आता मात्र या विद्यापीठाने किमान पाच विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचवेळी विद्यार्थ्यांनीही पार्टी केल्यामुळे हे घडल्याने वाईट वाटत असल्याची कबुलीही देण्यात आली.

आणखी वाचा - सावधान, महाराष्ट्राचा आकडा दोन हजारांवर

स्लुडरने इन्स्टाग्रामवरून जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. इतरांनीही आपल्या अशा कृत्यांमुळे प्रिय व्यक्तींवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून खेद व्यक्त केला आहे.
टेक्सासमधील काँग्रेसचे माजी प्रतिनिधी रॉन पॉल यांनी १६ मार्च रोजी एक लेख लिहिला. कोरोनाविषाणूची अफवा असे शिर्षक देत त्यांनी डेमोक्रॅटीक पक्षाला धारेवर धरले होते. आत्तापर्यंत शंभरपेक्षाही कमी बळी घेतलेल्या विषाणूचा मुकाबला करण्याच्या नावाखाली हा पक्ष जास्त सत्ता आणि अधिकार बळकावतो आहे असा आरोप त्यांनी केला होता.

आणखी वाचा - वाचा जर्मनीनं कसा रोखला मृत्यू दर!

त्यानंतर सहा दिवसांत त्यांच्यावर शब्द मागे घेण्याची वेळ आली, याचे कारण त्यांना मुलगा रँड पॉल हा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेला अमेरिकेचा पहिला सिनेटर ठरला. आता रँड यांनी केलेल्या पापामुळे किंवा आरोपामुळे त्यांच्या मुलावर हे भोग भोगण्याची वेळ आली असे म्हणणे उचित ठरणार नाही, मात्र कोरोना विषाणूकडे थोडे जास्त गांभीर्याने पाहणे त्यांना भाग पडले असेल अशी आशा तरी बाळगता येईल. दुसरीकडे रँड हा मात्र चाचणीचा अहवाल येईपर्यंत जिममध्ये जात होता आणि इतकेच नव्हे तर व्हाईट हाऊसच्या स्वीमींग पूलमध्ये पोहतही होता. त्यामुळे त्याच्या वडिलांकडून अशी बाळगणेही योग्य ठरणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus us citizen now regret for summer parties