Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेचा दणका; घेतला मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा इशारा संघटनेला दिला होता. चीनमधून कोरोना व्हायरससारख्या निर्माण झालेल्या आजाराचे गांभीर्य जागतिक आरोग्य संघटनेने लपवले असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'प्रशासनाला मी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश देत आहे. करोनाच्या प्रसाराची माहिती लपवणे व गैरव्यवस्थापन यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची नेमकी काय भूमिका आहे, त्याची समीक्षा सुरु आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या व्हायरसने अनेकांचे बळी घेतले आहेत. या व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने पारदर्शकपणे माहिती समोर ठेवली नाही असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

परप्रांतीय मजुरांच्या भावनांशी खेळू नका; कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री

संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो. अमेरिकेने मागच्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेला ४० कोटी अमेरिकन डॉलरचा निधी दिला होता.  जागतिक आरोग्य संघटनेला दिल्या जाणाऱ्या निधीचे काय करायचे? त्याबद्दल चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल भूमिका घेतली असा आरोप केला होता. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावेल असून काल (ता. १४) २४ तासात अमेरिकेत करोनामुळे २२२८ नागरिकांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus: US to halt funding to WHO says Trump