लॉकडाऊन शिथिल झाला समुद्रकिनारी तुफान गर्दी; अमेरिकेत पोलिसांच्या डोक्याला ताप

टीम ई-सकाळ
Monday, 20 April 2020

महापौरांच्या या आदेशानंतर अर्ध्या तासातच ह्या  समुद्रकिनाऱ्यावर तुफान गर्दी झाली होती.

Coronavirus : अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात शुक्रवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून, समुद्रकिनारी नागरिकांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला असून, संपूर्ण जगात कोरोनामुळे सर्वांत जास्त मृत्यूंची नोंद सुद्धा अमेरिकेतच झाली आहे. फ्लोरिडामध्ये रविवारी २४ तासांत १ हजार ४१३ नव्या कोरोना संक्रमणाची नोंद झाली आहे. अशातच शुक्रवारी अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील कौंटी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी काही नियमांसह खुला करण्यात आला आहे. हा समुद्रकिनारा सध्या नागरिकांना धावण्यासाठी, पोहण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी खुला करण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फ्लोरिडाचे महापौर लेनी करी म्हणाले की, काही शिथिल नियमांसह डुवल कौंटी हा समुद्रकिनारा दिवसातील काही तास नागरिकांसाठी शुक्रवार पासून खुला करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम करता यावा म्हणून वॉकिंग, धावण्यासाठी, पोहण्यासाठी तसेच मासेमारी करण्यासाठी समुद्रकिनारा खुला करण्यात येत आहे. हा समुद्रकिनारा सकाळी ६ ते ११ व संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत खुला राहणार आहे. याकाळात ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी असणार असून सोशल डिस्टंसिंगचे पूर्ण पालन होणे आवश्यक आहे. महापौरांच्या या आदेशानंतर अर्ध्या तासातच ह्या  समुद्रकिनाऱ्यावर तुफान गर्दी झाली होती. लोकांनी सोशल डिस्टंसिंग सुद्धा याठिकाणी पाळले नाही व सर्व नागरिक समुद्रकिनाऱ्याची मज्जा घेण्यास समुद्रकिनाऱ्यावर उतरले असल्याचे चित्र याठिकाणी पाहायला मिळाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फ्लोरिडाची स्थिती?
पामबीचच्या अहवालानुसार, सध्या फ्लोरिडामध्ये कोरोनाच्या संक्रमणाचे २४ हजार ७५३ प्रकरणे असून, त्यातील ७२६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या फ्लोरिडामधील ३ हजार ६४९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.  रविवारी २४ तासांच्या कालावधीत फ्लोरिडामध्ये कोरोना संक्रमणाचे १ हजार ४१३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सध्या अमेरिकेची काय आहे स्थिती
जगातील सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव हा अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर झाला असून आता संक्रमणाचा ७.५ लाखांचा टप्पा पार झाला आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाच्या संक्रमणाचे ७ लाख ६४ हजार २६५ प्रकरणे असून त्यातील ४० हजार ५६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण जगाच्या कोरोनाच्या आकड्याने सुद्धा शिखर गाठले असून संपूर्ण जगात कोरोनाच्या संक्रमणाचे २४ लाख ७ हजार ६९९ प्रकरणे झाली आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जगात सध्या १ लाख ६५ हजार ९३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच फ्लोरिडाच्या महापौरांचा समुद्र किनारे खुले करण्याचा निर्णयामुळे आता कोरोनाच्या संक्रमणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. महापौरांना लवकरच निर्णय बदलावा लागू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus us lock down over crowd florida beaches