Coronavirus :..म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली मोदींकडे मदत

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन निर्यातीवर बंदी 

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत १२ लाखांहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 60 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, ३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच आता अमेरिकेने भारताकडे मदत मागितली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 24 तासांत 1400 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्राण वाचवणे, हे ट्रम्प सरकारसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे. 

Donald Trump to make a statement on Coronavirus plans

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हायड्रॉक्सी क्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती केल्याची माहिती दिली जात आहे. 

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याशी चर्चा केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. त्यामध्ये मोदी म्हणाले, की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली होती आणि कोविड -19 च्या व्यवहारात भारत-अमेरिकेच्या भागीदारीची पूर्ण शक्ती वापरण्यास आम्ही सहमती दर्शवली.

In India, Trump is more popular than his trade policies | Pew ...

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन निर्यातीवर बंदी 

कोरोना व्हायरसविरूद्ध लढायला मदत करणाऱ्या मलेरिया औषध हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या औषधाची पुरेशी उपलब्धता निश्चित करण्यासाठी याची निर्यात त्वरित थांबविणे आवश्यक आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.त्यानुसार ही बंदी घालण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus US President Donald Trump calls PM Narendra Modi to ask for hydroxychloroquine