अमेरिकेनं इटलीला टाकलं मागं; युरोपमध्ये परिस्थिती बदलायला सुरुवात

टीम ई-सकाळ
Monday, 13 April 2020

व्हायरस दीर्घकाळ मानवाचा पाठलाग करेल, असं डेव्हिड यांनी म्हटलंय. कोरोनावरची लसच मानव जातीला यापासून वाचवू शकते.

न्यूयॉर्क Coronavirus: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसनं अमेरिकेत रौद्र रूप धारण केलंय. अमेरिकेवर ओढवलेलं सर्वांत मोठं संकट असल्याची स्थिती दिसत आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कला या रोगानं सर्वांत मोठा दणका दिल्यामुळं या धक्क्यातून अमेरिकेला सावरण्यासाठी खूप मोठा काळ लागणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर या व्हारसनं इराण आणि इटलीमध्ये धुमाकूळ घातला होता. कालपर्यंत इटलीत कोरोनाचे सर्वाधिक बळी होती. पण, अमेरिकेत दिवसाला दोन-अडीच हजार जणांचे बळी जात असल्यामुळं सध्या अमेरिकेतील बळींची संख्या सर्वोच्च आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सध्या 5 लाख 60 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 22 हजार 115 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबरो यांनी एनबीसीच्या मीट द प्रेस कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्या त्यांनी, कोरोना व्हायरस संदर्भात काही खुलासे केले आहेत. हा व्हायरस दीर्घकाळ मानवाचा पाठलाग करेल, असं डेव्हिड यांनी म्हटलंय. कोरोनावरची लसच मानव जातीला यापासून वाचवू शकते. जगभरात 18 लाखांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली असून, एक लाखावर नागरिकांचा यात बळी गेलाय. 

आणखी वाचा - वाचा शिस्तप्रिय जपानच्या लॉकडाऊन विषयी!

काय घडलं अमेरिकेत?

 • अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअर इस्टेट क्षेत्रातील सहकारी स्टेनली चेरा  (वय 70) यांचा कोरानामुळं मृत्यू 
 • आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 9 हजार 385 जणांचा मृत्यू; एक लाख 89 हजार शहवासियांना लागण
 • न्यूयॉर्कनंतर न्यूजर्सी शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका; आतापर्यंत दोन हजार 350 जणांचा मृत्यू 
 • अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये कोरोनाची चिंताजनक स्थिती
 • अमेरिकेच्या स्थितीवरून ट्रम्प यांना केलं जातयं लक्ष; आगामी अध्यक्षपदाची निवडणूक जड जाणार

आणखी वाचा - कायम शेतीवरच नांगर का फिरतो?

कुठं काय घडलं?

 • इटलीत 19 मार्चनंतर एका दिवसांत सर्वांत कमी मृत्यू; गेल्या 24 तासांत 431 जणांचा बळी 
 • अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक 19 हजार 899 नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू 
 • अजूनही इटलीत 1 लाख 56 हजार नागरिकांना कोरोनाची लागण 
 • फ्रान्समध्ये विमानवाहू युद्धनौकेवर 50 सैनिकांना कोरनाची लागण; 1900 सैनिक आयसोलेटेड 
 • फ्रान्समध्ये आतापर्यंत 14 हजार नागरिकांचा बळी 
 • स्पेनमध्ये कारखाने पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत
 • रशियात एका दिवसात 2 हजार 558 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले 
 • चीनमध्ये आणखी 108 जणांना कोरोनाची लागण 
 • इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष रब्बी इलियाहू बक्शी डोरेन (वय 79) यांचा कोरोनामुळं मृत्यू 
 • इस्त्रायलमध्ये आतापर्यंत 11 हजार जणांचा कोरोनामुळं बळी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa crossed italy death toll huge loss New York city