हुश्श : अमेरिकेत कोरोना रुग्णांची वाढ थांबली!

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

अमेरिकेत गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनामुळे जवळपास १,५०० जणांचा मृत्यू झाला असून २४ हजार ८९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

वॉशिंग्टन Coronavirus  : कोरोनाविरोधातील लढाईत अमेरिकेला निर्णायक यश मिळण्याची शक्यता दिसत असून रुग्णसंख्या वाढण्याचा आलेख स्थिरावला असल्याचा दावा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या एका विशिष्ट पातळीच्या पुढे गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कोरोनाविरोधात कठोरपणे उपाययोजना केल्याचाच हा परिणाम असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेत गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनामुळे जवळपास १,५०० जणांचा मृत्यू झाला असून २४ हजार ८९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत गेल्या आठवड्यात दरदिवशी किमान दोन हजार जणांचा मृत्यू होत होता आणि ३० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत होते. त्या तुलनेत आता परिस्थिती सुधारली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले,‘‘कोरोनाच्या संकटाचा सामना करताना अमेरिकेची सरशी होत आहे. रुग्ण संख्या कमी होत असून त्याबाबतचा आलेख आता स्थिरावला आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, मिशीगन आणि लुसियानासारख्या हॉटस्पॉटमधील रुग्णलयांमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कठोर उपाययोजनांमुळे हे सर्व शक्य झाल्याचे स्पष्ट असून अमेरिकी जनतेची चांगली साथ मिळत आहे.’’ कोरोनाबळी आणि संसर्गग्रस्तांच्या यादीत अमेरिका सध्या प्रथम क्रमांकावर आहे. 

आणखी वाचा - सोशल मीडियावरील कोरोनाबाबतचे हे दावे ठरलेत खोटे!

आणखी वाचा - पाकिस्तानात लॉकडाऊनचं काही ठरेना

चोवीस तासांत दीड हजार बळी 
अमेरिकेत गेल्या चोवीस तासांमध्ये १,५०९ जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कालही देशात १,५१४ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे अमेरिकेत बळी पडणाऱ्यांची संख्या चोवीस हजारांपर्यंत गेली असून साडे पाच लाखांहून अधिक नागरिक संसर्गग्रस्त झाले आहेत. अमेरिकेतील कोरोनाचा केंद्र असलेल्या न्यूयॉर्क राज्यामध्ये बळींची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, सर्वांत वाईट काळ सरला असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa new cases reducing president donald trump