अमेरिकेत दिवसात साडेचार हजार बळी; न्यू जर्सीत हॉस्पिटलमध्ये आढळले १८ मृतदेह 

टीम ई-सकाळ
Friday, 17 April 2020

न्यू जर्सीच्या रुग्णालयात एकूण ६८ जणांचा नुकताच मृत्यू झाला असून, यातील २६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आलेली होती,

न्यू जर्सी Coronavirus : अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान न्यू जर्सी पोलिसांना राज्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयात १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आम्ही राबवलेल्या शोधमोहिमेत एंडोव्हर येथील रुग्णालयात रविवारी पाच मृतदेह सापडले, तर सोमवारी १३ मृतदेह सापडल्याची माहिती पोलिस प्रमुख एरिक डॅनियेलसन यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, अमेरिकेत 24 तासांत साडेचार हजार जणांचा कोरोनामुळं बळी गेलाय. आतापर्यंत देशात सहा लाख जणांना कोरोनाची लागण झालीय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - इटलीचे नागरिक म्हणतात, कोरोनानं मरतो पण, उपाशी मारू नका!

न्यू जर्सीचे रुग्णालय चर्चेत
न्यू जर्सीच्या रुग्णालयात एकूण ६८ जणांचा नुकताच मृत्यू झाला असून, यातील २६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आलेली होती, ती चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले. या भागातील १०० रहिवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील दीर्घकालीन देखभाल सुविधागृहांना सरकारकडून १ लाखाहून अधिक एन-९५ मास्क, जवळजवळ ७ लाख सर्जिकल मास्क, ७ हजार फेस शील्ड आणि ७ लाखाहून अधिक हातमोजे वितरित करण्यात आले आहेत. 

आणखी वाचा - ऑलम्पिकच्या तयारीत रमलेल्या जपानमध्ये धोका वाढला

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय घडतंय अमेरिकेत?
जगात 185 देशांमध्ये कोरोनानं कहर मजावला असला तरी, अमेरिकेत काल गुरुवारी एका दिवसात 4 हजार 591 जणांचा बळी गेलाय. कोरोनाचा सगळ्यांत मोठा दणका अमेरिकेला बसलाय. सध्या अमेरिकेत 6 लाख 72 हजार जणांना कोरोनाची लागण झालीय. तर आतापर्यंत देशात एकूण 33 हजार 325 जणांचा कोरोनामुळं बळी गेलाय. जगातील एकूण बळींची संख्या 1 लाख 47 हजार आहे. त्यात अमेरिकेची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. त्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या निर्णयाला अमेरिकेत विरोधही होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa new jersey hospital 18 bodies found 4 thousand 500 deaths 24 hours