धक्कादायक :  सर्वाधिक कोरोगाग्रस्त असलेला अमेरिका लॉकडाऊन रद्द करणार! 

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरूच असून गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिका कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

Coronavirus : देश पुन्हा सुरू करण्याच्या अगदी जवळ आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्पष्ट केलं. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, देशात ३० एप्रिलपर्यंत सामाजिक अंतर निर्माण करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आली आहेत. कोरोनामुळे अमेरिकेतील ९५ % लोकांवर याचा प्रभाव पडला आहे. त्यामुळं सरकार लॉकडाऊन मागे घेण्याच्या विचारात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरूच असून गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिका कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक संसर्ग झालेले रुग्ण आणि कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. जगात सर्वात जास्त कोरोनाचे निदान करण्यासाठी घेण्यात आलेल्या टेस्टिंग सुद्धा अमेरिकेतच घेण्यात आलेल्या आहेत. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अशातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक बातमी दिली आहे.

हेही नक्‍की वाचा : कामगारांसाठी मोठा निर्णय ! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की ते देश पुन्हा सुरू करण्याच्या अगदी जवळ आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, देशात ३० एप्रिलपर्यंत सामाजिक अंतर निर्माण करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. देशातील ९५ टक्क्यांहून अधिक लोकांवर या प्राणघातक विषाणूमुळे परिणाम झाला आहे. कोरोना विषाणू विषयी पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, मी याविषयी माझी टीम आणि वरिष्ठ तज्ज्ञांशी बोलतो आहे आणि आम्ही देश पुन्हा उघडण्याच्या योजनेची पूर्तता करण्यासाठी अगदी जवळ आहोत अशी आशा आहे की ठरलेल्या वेळेच्या आधी सर्व ठीक होईल.

हेही नक्‍की वाचा : ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका ! वैज्ञानिकांचा अभ्यास सुरु 

ट्रम्प म्हणाले, "माझ्या प्रशासनाच्या योजना आणि मार्गदर्शक तत्त्वांमुळे अमेरिकन लोकांना सामान्य जीवन सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळेल, ज्याची त्यांना आवश्यकता आहे. आम्हाला हीच गरज आहे. आम्हाला आपला देश पुन्हा सुरू करायचा आहे, आम्हाला पुन्हा सामान्य जीवन जगायचं आहे. आपला देशातून लवकरच लॉकडाऊन काढण्यात येणार आहे आणि तो यशस्वीरित्या येईल.''

आणखी वाचा - कुठं सुकतंय युरोपिय देशांचं?

कोरोनाची काय आहे परिस्थिती?
सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरु असून अमेरिका त्याचे मुख्य केंद्र आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यातील मृत्यूंची पण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाचे ५,८७,१७३ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात अमेरिकेत २६,६४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत २३६४४ लोकांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या २४ तासात १४३५ लोकांचा कोरोनामुळे अमेरिकेत मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa planning end lock down said president donald trump