पंतप्रधान मोदी जगातील एकमेव नेते; ज्यांना व्हाइट हाऊस करते फॉलो

टीम ई-सकाळ
Friday, 10 April 2020

व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलमध्ये भारतातील  पीएमओ इंडिया आणि भारताचे राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल आहेत.

Coronavirus : अमेरिकेतील व्हाइट हाऊस हे तेथील राष्ट्राध्यक्ष यांचे कार्यालय म्हणून काम पाहते. जगातील सर्वांत जास्त शक्तिशाली असे प्रशासकीय कार्यालय समजल्या जाणाऱ्या व्हाइट हाऊसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी जगातील एकमेव राजकीय व्यक्ती आहेत, ज्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यासोबतच, भारतातील इतर दोन अकाऊंटसना सुद्धा व्हाईट हाऊसकडून फॉलो करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अलिकडच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप मजबूत झाले आहेत. याचे उदाहरण म्हणजे आता व्हाईट हाऊसने आपल्या ट्विटर हँडलद्वारे पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यास सुरवात केली आहे. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलद्वारे जगातील इतर कोणत्याही नेत्याला फॉलो केले जात नाही, त्यामुळं पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांना व्हाइट हाऊस फॉलो करत आहे. 

आणखी वाचा - पिंपरीत गरजू लोकांना मिळणार पॅकड् फूड, ही आहेत दहा ठिकाणे

कोणाला फॉलो करते व्हाईट हाऊस?
आतापर्यंत व्हाईट हाऊस एकूण १९ ट्विटर अकाउंटला फॉलो करत आहे. यापैकी १६ जण अमेरिकेचे आणि तीन जण भारताचे आहेत. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलमध्ये भारतातील  पीएमओ इंडिया आणि भारताचे राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल आहेत. अलीकडेच, भारताच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला औषध दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. आता पीएम मोदी यांनीही ट्विट केले आहे. त्यास उत्तर म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत आणि म्हटले आहे की भारत आणि अमेरिका मिळून कोरोनाला पराभूत करतील. यासह पंतप्रधानांनी असे लिहिले की अशा काळातच मित्र जवळ येतात. पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना प्रत्युत्तर देऊन लिहिले आहे की, 'अध्यक्ष ट्रम्प मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. अशा वेळी मित्र जवळ येतात. भारत आणि अमेरिका यांच्यातील हे संबंध आजपर्यंतच्या सर्वात मजबूत टप्प्यात आहे. कोरोनाविरूद्ध मानवतेच्या या लढाईत भारत सर्वांना मदत करण्यास सज्ज आहे.  भारत आणि अमेरिका येणाऱ्या काळात एकत्र येऊन कोरोनाला हरवेल.'

आणखी वाचा - अक्षयकुमारने मुंबई महापालिकेला दिली मोठी देणगी, पण कशासाठी?

आधी धमकी, मग कौतुक
कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी नुकतेच भारत सरकारने जगातील अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला आहे. यामध्ये अमेरिकेचा समावेश आहे. मुळात या औषधाचा पुरवठा करण्यावरून ट्रम्प यांनी भारताला धमकावले होते. परंतु, ट्रम्प यांनी नंतर सारवासारव करत, भारताचं कौतुक करायला सुरुवात केली. औषध अमेरिकेत निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते आणि भारताचे आभार देखील मानले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa white house following pm narendra modi twitter account