जागतिक बँकेची आशियातील देशांना मदत; कोणाला किती निधी मिळणार?

टीम ई-सकाळ
Friday, 3 April 2020

भारतासारख्या देशात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने भारतात साथीच्या रोगांचा अधिक धोका आहे. भविष्यात देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी भारताला आरोग्य क्षेत्रासंदर्भातील दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे जागतिक बँकेने सांगितले आहे.

नवी दिल्ली Coronavirus : जागतिक बँकेने भारताला तातडीची मदत म्हणून एक अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. ‘कोरोना’विरुद्ध लढा यशस्वी होण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम बनविण्यासाठी हा निधी दिल्याचे जागतिक बँकेने सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात मोठ्या वेगाने कोरोनाचा प्रसार होत असून विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. जागतिक बँक येत्या १५ महिन्यांच्या काळात १६० अब्ज डॉलर विविध देशांना देणार आहे. यामुळे विविध देशांच्या आरोग्य यंत्रणांना बळ मिळेल. जागतिक बँकेने हाती घेतलेल्या कार्यामुळे कोविड-१९ चा प्रसार कमी करण्यात मदत होणार आहे , असे जागतिक बँकेचे समूह अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी सांगितले. भारतात देखील कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लोकसंख्येचा विचार करता देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याने जागतिक बँकेने भारताला सात हजार पाचशे कोटींचा (एक अब्ज डॉलर) आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. जागतिक बँकेने भारताला सर्वाधिक आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. जागतिक बँकेने जगातील बऱ्याच देशांना आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. एकूण निधीपैकी पहिल्या टप्प्यातील १.९ अब्ज डॉलरचा निधी देण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा - पिंपरीत निझामुद्दीनमधील आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण

भारतासारख्या देशात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने भारतात साथीच्या रोगांचा अधिक धोका आहे. भविष्यात देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी भारताला आरोग्य क्षेत्रासंदर्भातील दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे जागतिक बँकेने सांगितले आहे. जागतिक बँकेने भारताला सात हजार पाचशे कोटींचा निधी दिला असून कोरोनासंदर्भातील तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारणे आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) यासारखी विविध कार्ये केली जाणार आहेत. याशिवाय संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि आरोग्य विषयक साधने घेण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. 

आणखी वाचा - कोरोना हवेतून पसरत नाही; जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष

जागतिक बँक देत असलेला निधी 

  • १ अब्ज डॉलर - भारत 
  • २० कोटी डॉलर - पाकिस्तान
  • १० कोटी डॉलर - अफगाणिस्तान 
  • ७३ लाख डॉलर - मालदीव 
  • १२.८६ कोटी डॉलर - श्रीलंका 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus world bank 1 billion dollars aid for india