Coronavirus : जगभरात कोणत्या देशात किती कोरोना रुग्ण? वाचा सविस्तर बातमी

पीटीआय
Thursday, 9 April 2020

जगभरातील १९२ देशांमध्ये फैलाव झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात संसर्गग्रस्तांची संख्या १५ लाखांवर गेली असून बळींचा आकडाही ९० हजारांच्या जवळ जाऊन ठेपला आहे. एकूण बाधितांपैकी निम्मे बाधित युरोपमध्ये आहेत.

न्यूयॉर्क - जगभरातील १९२ देशांमध्ये फैलाव झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात संसर्गग्रस्तांची संख्या १५ लाखांवर गेली असून बळींचा आकडाही ९० हजारांच्या जवळ जाऊन ठेपला आहे. एकूण बाधितांपैकी निम्मे बाधित युरोपमध्ये आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक देशांत रुग्णांची चाचणी घेण्याची पुरेशी यंत्रणा नसल्याने लोकही स्वतःहून पुढे येत नाहीत. जाहीर होणाऱ्या बाधितांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक जण बाधित असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे इटलीत आत्तापर्यंत अठरा हजार जणांचा मृत्यू झाला असून हा देश याबाबतीत अजूनही सर्वांत पुढे आहे. येथे बाधितांची संख्याही १.३९ लाख आहे.

अमेरिकेत ४.३० लाख बाधित असून मृतांच्या संख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही संख्या स्पेनमधील मृतांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. अमेरिकेतील संसर्गाच्या वाढीचा वेग वाढल्याने संशोधक  चिंतित आहेत.

स्पेनमध्ये १५ हजारांच्या आसपास लोक मरण पावले आहेत. रुग्ण आणि मृत व्यक्ती यांचे प्रमाण पाहता इटलीतील परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याचे दिसत आहे. 

अमेरिकास्थित ११ भारतीय नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अजून १६ जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेत १४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus worldwide update 9th april 2020