Coronavirus : चीनने माध्यमांची केलेली मुस्कटदाबी ठरली जीवघेणी

वृत्तसंस्था
Wednesday, 22 April 2020

कोरोनाच्या संसर्गाचा जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा फटका बसू लागला असून एकाधिकारशाही असणाऱ्या चीन, इराणसारख्या देशांमध्ये उद्रेकाची खरी माहिती दडविली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पॅरिसमधील रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (आरएसएफ) या संस्थेने मांडलेल्या वार्षिक माध्यम स्वातंत्र्य क्रमवारीतून या संसर्गाचा माध्यमांवर नेमका कसा परिणाम होतो आहे याचा वेध घेण्यात आला आहे.

लंडन - कोरोनाच्या संसर्गाचा जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा फटका बसू लागला असून एकाधिकारशाही असणाऱ्या चीन, इराणसारख्या देशांमध्ये उद्रेकाची खरी माहिती दडविली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पॅरिसमधील रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (आरएसएफ) या संस्थेने मांडलेल्या वार्षिक माध्यम स्वातंत्र्य क्रमवारीतून या संसर्गाचा माध्यमांवर नेमका कसा परिणाम होतो आहे याचा वेध घेण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जाणीवपूर्वक दुर्लक्ष
सुरवातीच्या काही आठवड्यांमध्ये चिनी राजकारण्यांनी या विषाणूच्या घातकतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वुहानचे महापौर झोऊ जियानवँग यांनीही नंतर लोक आमच्या माहितीवर नाराज असल्याची कबुली दिली होती. चीनने माध्यमांची केलेली मुस्कटदाबी त्यांच्यासाठी अक्षरशः जीवघेणी ठरली असे ‘आरएसएफ’ने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis in China due to pressing news

Tags
टॉपिकस
Topic Tags: