Coronavirus : आता तरी सुधारा नाहीतर...; ट्रम्प यांची चीनला धमकी

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

कोरोना व्हायरसशी संबंधित चुकीची माहिती चीनने दिली, त्यामुळे जगाला त्याचे परिणाम भोगावा लागत आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की चीनमधील वुहान शहरातून हा संसर्ग जगभर पसरला.

वॉशिंग्टन : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमध्ये डिसेंबरमध्ये झाली होती. तज्ज्ञांच्या मते चीनमध्ये त्याआधीच कोरोनाचा प्रसार झाला होता,  मात्र त्यांनी याबाबत माहिती दिली नाही. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर उघडपणे हल्ला केला आहे. कोरोना व्हायरससाठी चीनने जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला वेड्यात काढले आहे, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित चुकीची माहिती चीनने दिली, त्यामुळे जगाला त्याचे परिणाम भोगावा लागत आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की चीनमधील वुहान शहरातून हा संसर्ग जगभर पसरला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी चीनला धमकीही दिली. ट्रम्प यांना पत्रकारांनी, चीनला काही परिणाम का भोगावे लागत नाही आहेत? असा प्रश्न विचारला. यावर ट्रम्प यांनी, कोणतेही दुष्परिणाम नाहीत हे तुम्हाला कसं माहित? असे उत्तर देत चीनला दुष्परिणाम लवकरच दिसतील, असा इशाराही दिला आहे. यापूर्वीही ट्रम्प यांनी चीनने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून अमेरिकेचा फायदा घेतल्याचा आरोपही केला होता. ट्रम्प यांनी अशी धमकी दिली होती की जर चीन निःपक्षपातीपणे वागले नाही तर आम्ही ते सोडून देऊ. ३० वर्षांपासून चीन अमेरिकेचा फायदा घेत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

ट्रम्प सतत चीनवर कोरोना विषाणूशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप करीत आहेत. कोरोना विषाणूची प्राथमिक माहिती चीनने प्रसिद्ध केली आहे, ज्या शिक्षेचा परिणाम आज जग भोगत आहे. ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचे चिनी विषाणूचे वर्णन केले होते आणि ते म्हणाले होते की, "त्यांच्या कृत्यामुळे सारं जग बरीच शिक्षा भोगत आहे. ट्रम्प यांनी वेळोवेळी कोरोनासाठी चीनलाच जबाबदार ठरवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump on coronavirus misinformation from China