Coronavirus : पीएम केअरला केलेली मदतच सीएसआरमध्ये; सीएम केअरचा समावेश नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 12 April 2020

पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यामधून मात्र मुख्यमंत्री सहायता निधीला वगळण्यात आल्याने मुख्यमंत्री सहायता निधीत म्हणजे सीएम केअर मध्ये जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं स्पष्ट केले आहे.

मुंबई : पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यामधून मात्र मुख्यमंत्री सहायता निधीला वगळण्यात आल्याने मुख्यमंत्री सहायता निधीत म्हणजे सीएम केअर मध्ये जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं स्पष्ट केले आहे. अशा वेळी आता संकटकाळातही राजकारण केलं जातंय का? असा प्रश्न समोर येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मदत चालू झाल्यापासून २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे. देशासमोर कोरोनाचं संकट असल्यानं अनेक कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचं दान केलं आहे. अशात केंद्राने ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलेली मदत सीएसआर म्हणून ग्राह्य धरली जाणार नसली, तरी राज्य आपत्ती व्यवस्थापनाला केलेली मदत सीएसआरमध्ये मोजली जाईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी थेट राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. तर राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीवर केंद्राचं नियंत्रण असतं. त्यामुळेच केंद्रानं हा निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जातं. राज्य आपत्ती व्यवस्थापना निधीत जमा होणाऱ्या रकमेचं वाटप केंद्राकडून केलं जातं. केंद्राच्या या स्पष्टीकरणानंतर राज्य सरकारांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तमिळनाडू सरकारनं मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा करण्यात आलेली रक्कम तातडीनं राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत वळती केली आहे.

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

सीएसआर म्हणजे काय?
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआरमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांना त्यांच्या एकूण लाभापैकी किमान २ टक्के रक्कम सीएसआरच्या अंतर्गत सामाजिक कार्यासाठी दान करावी लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donations to CM Relief Fund Cannot Be Counted as CSR: Corporate Affairs Ministry