Coronavirus : अमेरिकेत कोरोना व्हायरसवरील पहिली लस टोचण्यात आली

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 मार्च 2020

लसीबद्दल...

  • ‘mRNA-1273’ असे सांकेतिक नाव 
  • सहभागींना संसर्गाची लागण होण्याची शक्यता नाही. कारण, त्यांना दिलेल्या लसीमध्ये कोरोना विषाणूचा समावेश नाही
  • चाचणीसाठी निवड केलेल्या १८ ते ५५ वर्षांच्या व्यक्तींना मात्रा जास्त 
  • रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते का, याचे निरीक्षण करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करणार व त्याचे दुष्परिणामही तपासणार 
  • यातील सहभागींना प्रत्येक भेटीसाठी १०० डॉलर मोबदला मिळणार

वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना व्हायरसवरील (कोविड -१९) लसीसाठी चाचणी सुरू झाली असून, चार निरोगी व्यक्तींच्या हातावर याची पहिली लस सोमवारी (ता. १६) टोचण्यात आली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कैसर पर्मनेंटी वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (केपीडब्ल्यूएचआरआय) या संस्थेतील सिएटल येथील केंद्रात औषधावर संशोधन सुरू आहे. यापूर्वी कोरोना विषाणूवरील लसीसाठी मानवावर चाचणी घेण्यात आलेली नाही. संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी प्रथमच चौघांना ही लस देण्यात आली. ‘केपीडब्ल्यूएचआरआय’मधील चाचणीच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ‘अशा आणीबाणीच्या काळात काय करता येईल ते करण्याची संस्थेतील प्रत्येकाची इच्छा आहे,’ असे कैसर पर्मनेंटी अभ्यास गटाच्या डॉ. लिसा जॅकसन यांनी सांगितले.

Coronavirus : 'या' रक्तगटातील लोक ठरले सर्वाधिक कोरोनाचे बळी; संशोधकांचा निष्कर्ष!

या मोहिमेत कोरोनावरील लस टोचून घेणारी पहिली सहभागी महिला जेनिफर हॉलर (वय ४३) ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एका लहान कंपनीत काम करते. तिच्यानंतर आणखी तीन जणांना ही लस टोचली. यातील एक नील ब्रॉउनिंग (वय ४६) हा मायक्रोसॉफ्टमध्ये अभियंता आहे.

‘केपीडब्ल्यूएच-आरआय’च्या या संशोधनाचे निष्कर्ष सकारात्मक आले, तरी ही लस १२ ते १८ महिन्यांनंतरच सर्वांना उपलब्ध होऊ शकेल.
- डॉ. ॲन्थोनी फाउसी, संशोधक, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first vaccine was infected with the Corona virus in the United States