गूगलच्या कर्मचाऱ्यांना झूम ॲप वापरास मनाई

पीटीआय
Friday, 10 April 2020

सुरक्षेच्या कारणावरून गूगलने आपल्या कर्मचाऱ्यांना झूम ॲप वापरण्यास मनाई केली आहे. झूम ॲप हा व्हिडिओ कॉन्फरसिंगसाठी लोकप्रिय मानला जातो. विशेष म्हणजे कंपनीने गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मेल पाठवून झूम ॲप आपल्या लॅपटॉपममधून काढून टाकावा असे आदेश दिले होते. झूम ॲपच्या विश्‍वसनियतेवर प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याने गूगल कंपनीने ॲपच्या वापरावर निर्बंध आणले आहे. लॉकडाउननंतर झूम ॲप वापरात प्रचंड वाढ झाली आहे.

वॉशिंग्टन - सुरक्षेच्या कारणावरून गूगलने आपल्या कर्मचाऱ्यांना झूम ॲप वापरण्यास मनाई केली आहे. झूम ॲप हा व्हिडिओ कॉन्फरसिंगसाठी लोकप्रिय मानला जातो. विशेष म्हणजे कंपनीने गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मेल पाठवून झूम ॲप आपल्या लॅपटॉपममधून काढून टाकावा असे आदेश दिले होते. झूम ॲपच्या विश्‍वसनियतेवर प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याने गूगल कंपनीने ॲपच्या वापरावर निर्बंध आणले आहे. लॉकडाउननंतर झूम ॲप वापरात प्रचंड वाढ झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गूगलच्या सुरक्षेविषयी टीमने म्हटले की, सुरक्षेच्या निकषावर झुम ॲप पात्र ठरत नसल्याने महत्त्वाच्या डेटाला धोका निर्माण झाला. झूम ॲपमुळे सायबर गुन्हेगारास यूजरचा डेटा हॅक करण्यास मदत मिळू शकते, असेही निदर्शनास आले. यानुसार कर्मचारी आता आपल्या लॅपटॉपवर झूम ॲप वापरु शकणार नाहीत. अर्थात कर्मचारी हे आपल्या मित्रांना किंवा कुटुंबाशी व्हिडिओ कॉलिंसगाठी झुम ॲपचा वापर करु शकतील. यापूर्वी ॲलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स ने झूम ॲपवर बंदी आणली होती. कर्मचाऱ्यांनी हा ॲप वापरु नये, असेही सांगितले होते. यादरम्यान, भारतातील कॉम्प्यूटर रिस्पॉन्स टीम आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने (सीइआरटी) देखील झूम ॲपच्या सुरक्षेवरून गाइडलाइन्स जारी केली होती. झूम ॲप हे सायबर हल्ल्याचे माध्यम ठरु शकते, असे सीइआरटीने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google employees prohibit the use of the Zoom app