Coronavirus : अमेरिकन गायक, ग्रॅमी विजेते जॉन प्राइन यांचा कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि ग्रॅमी विजेते जॉन प्राइन यांचा कोरोनामुळे वयाच्या ७३ व्या वर्षी मृत्यू झाला. प्राईन यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून जॉन खूप आजारी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर लगेचच त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होतं. 

न्यूयॉर्क : प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि ग्रॅमी विजेते जॉन प्राइन यांचा कोरोनामुळे वयाच्या ७३ व्या वर्षी मृत्यू झाला. प्राईन यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून जॉन खूप आजारी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर लगेचच त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होतं. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्राइन यांच्यावर वँडरबिल्ट युनिव्हरसिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. ते एकूण 13 दिवस आयसीयूमध्ये होते. जॉन यांच्या कुटुंबीयांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. प्राइन यांची पत्नी फियोना यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती 20 मार्चला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली होती. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या परिवाराकडून माहिती मिळाली आहे की, प्राइन कोव्हिड-19 (COVID-19)ने संक्रमित झाल्यानंतर त्यांच्या केसमध्ये खूप समस्या होत्या, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती?

दरम्यान, 10 ऑक्टोबर 1946 रोजी जॉन यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता आणि 14 वर्षांचे असल्यापासून त्यांनी गिटारचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी शिक्षण देखील संगीतातूनच पूर्ण केले होते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्या काळात त्यांनी गाणी लिहिण्यास सुरूवात केली. 1991 मध्ये त्यांनी बेस्ट कंटेंपररी फोक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता. याच कॅटेगरीमध्ये 2005 मध्ये सुद्धा त्यांना दुसरा ग्रॅमी अवार्ड मिळाला होता. 2019मध्ये त्यांना द रेकॉर्डिंग अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. ते गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरमुळे त्रस्त होते. त्यांच्या मानेची आणि फुप्फुसांची शस्त्रक्रिया देखील झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grammy-winning country folk singer John Prine dies at 73 of coronavirus complications