HCQ हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

भारत किती उत्पादन करू शकतो?

 • भारताने अगोदरच हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे उत्पादन वाढविले आहे. 
 • ७० टक्के - निर्यातीत भारताचा वाटा
 • १० टन - दरमहा सरासरी उत्पादन
 • ४० टन - एप्रिल महिन्यातील उत्पादन
 • ७० टन - मे महिन्यातील संभाव्य उत्पादन
 • ३५ कोटी - भारतात दर महिन्याला गोळ्यांचे उत्पादन होणार
 • ३ रुपये - भारतातील एका गोळीची किंमत

सध्या संपूर्ण जग ‘कोव्हिड १९’च्या (कोरोना) विळख्यात अडकले आहे. काही रुग्णांमध्ये ‘कोरोना’वरील उपचारात आणि संसर्ग रोखण्यात हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (HCQ) महत्त्वाचे ठरत असल्याचे दिसले आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननेही देशभरातील हॉस्पिटलमध्ये या औषधाला मंजुरी दिली आहे.  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (आयसीएमआर) कोरोनावरील उपचारात या औषधाचा वापर करण्याची सूचना केली आहे.

एचसीक्यू का?
काही रुग्णांमध्ये ‘कोरोना’वरील उपचारात आणि संसर्ग रोखण्यात हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) महत्त्वाचे ठरत असल्याचे दिसले आहे. ‘कोरोना’वर हे औषध खरेच कितपत उपयोगी आहे, हे पाहण्यासाठी आणखी चाचण्या गरजेच्या आहेत.

भारत किती उत्पादन करू शकतो?

 • भारताने अगोदरच हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे उत्पादन वाढविले आहे. 
 • ७० टक्के - निर्यातीत भारताचा वाटा
 • १० टन - दरमहा सरासरी उत्पादन
 • ४० टन - एप्रिल महिन्यातील उत्पादन
 • ७० टन - मे महिन्यातील संभाव्य उत्पादन
 • ३५ कोटी - भारतात दर महिन्याला गोळ्यांचे उत्पादन होणार
 • ३ रुपये - भारतातील एका गोळीची किंमत

एप्रिल व मे महिन्यात भारत ११० टन HCQ चे उत्पादन करेल त्यापैकी १० टन भारताला लागेल. उर्वरित १०० टन निर्यात केली जाईल.

यावर उपयोगी

 • हिवताप
 • ऱ्हुमेटॉईड 
 • आर्थरायटीस  
 • लुपस

या देशांना हवेय ?
अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्राईल, आणि भारताचे शेजारी देश.

भारतातील उत्पादक कोण ?

 • झायडस कॅडिला
 • इप्का लॅबरोटरीज
 • इनटास फार्मास्युटीकल्स
 • एमसीडब्लू हेल्थकेअर 
 • मॅक्लोडस फार्मास्युटिकल्स
 • सिप्ला
 • लुपिन

एपीआय उत्पादक
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन तयार करण्यासाठी ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंटची (एपीआय) गरज असते. एपीआय तयार करणाऱ्या कंपन्या...

 • अबॉट इंडिया
 • रुसान फार्मा
 • मंगलम ड्रग्ज
 • युनिकेम रेमेडिज
 • लॉरस लॅब्ज
 • विजयश्री ऑर्ग्यानिक्स

झायडस कॅडिला आणि इप्का लॅबरोटरीज यांनी उत्पादनाची पद्धत विकसित केली आहे, त्यामुळे वेगाने हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे उत्पादन शक्य. त्यांच्याकडे सहा महिने पुरेल एवढ्या कच्च्या मालाचा साठा आहे. उर्वरित कंपन्या कच्चा माल चीन, कोरिया, इटली, फिनलंड सारख्या देशांतून आयात करतात, त्यामुळे त्यांना उत्पादनासाठी जास्त वेळ लागतो.

अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये मलेरियाचा धोका नसल्याने या औषधांची निर्मिती फारशी केली जात नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HCQ hydroxychloroquine and Corona