Coronavirus : आम्हाला वाचवा; इम्रान खान यांनी मागितली भीक (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

कर्जबाजारी झालेला पाकिस्तान कोरोनाव्हायरसमुळे हतबल झाला आहे. अशात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन, केले आहे. देश अडचणीत असताना आम्हाला वाचवा असे म्हणत इम्रान खान यांनी एकप्रकारे भीकच मागितली आहे.

इस्लामाबाद : कर्जबाजारी झालेला पाकिस्तान कोरोनाव्हायरसमुळे हतबल झाला आहे. अशात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन, केले आहे. देश अडचणीत असताना आम्हाला वाचवा असे म्हणत इम्रान खान यांनी एकप्रकारे भीकच मागितली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमधील सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांचे हे आवाहन कोरोनाचे कारण पुढे करत कर्ज माफ करण्याची मोहीम मानली जात असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे. ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये इम्रान यांनी जगातील वित्तीय संस्थांना पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी मोहीम राबवावी असे आवाहन केले. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ केले जावे, अशी मागणी इम्रान यांनी केली. या व्हिडिओ इम्रान खान म्हणतात की, पाकिस्तानसारखा कर्जबाजारी देश कोरोनाची सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जगातील बड्या संस्थांनी अशा देशांना मदत करण्यासाठी एक मोहीम सुरू करावी.

तलवारीने कापलेला त्या पोलिस अधिकाऱ्याचा हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या सार्क कोव्हिड-19 फंडातून कोरोनाविरूद्ध लढण्याच्या नावाखाली पाकिस्तानने पैशांची मागणी केली होती. आता इम्रान खान यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले आहे की जर पाकिस्तानला लवकरच मदत केली नाही तर कोरोनापेक्षा जास्त लोक उपासमारीने मरणार आहेत. इम्रान यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना विकसित देशांना मदत करण्याची विनंती केली जेणेकरुन ते कोरोना व्हायरसच्या आव्हानांवर मात करू शकतील.

Coronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल

इमरान यांनी व्हिडीओ पोस्ट करत, मी आज जागतिक समुदायाला सांगत आहे की कोव्हिड -19 विरुद्धच्या लढाईत दोन धोरणे अवलंबली जात आहेत. विकसित देश प्रथम कोरोनाविरूद्ध लॉकडाऊन करून लढा देत आहेत आणि या लॉकडाऊनमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीकरिता अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. मात्र पाकिस्तानसारख्या विकसनशील देशांना हे सर्व करता येत नाही आणि येथे लॉकडाऊनमुळे आता उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan urges world community to grant debt relief as Pakistans coronavirus