esakal | Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने रद्द !
sakal

बोलून बातमी शोधा

India extends international passenger flight ban till April 14

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत असतानाच सरकारने आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता,. आता आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नव्याने सूचना जारी केल्या आहेत.

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने रद्द !

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत असतानाच सरकारने आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता,. आता आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नव्याने सूचना जारी केल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली होती. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली होती. आता ही विमानसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

Coronavirus : स्पेनच्या उपपंतप्रधानांसह पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आल्याने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अक्षरश: धावपट्टीच्या शेजारची मोकळी जागाही विमानांच्या पार्किंगसाठी वापरण्यात आली आहे. दिल्लीतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. दिवसाला १ हजार ४२४ विमाने दिल्लीतून उड्डाण घेतात आणि याठिकाणी उतरतात. येत्या मेपर्यंत १५०० पर्यंत वाढ होणार असल्याचे विमानतळ प्राधीकरणाच्या एका अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. विमानांचे वाहतूक मोठ्या प्रमाणात असले तरीही येथे केवळ २०० विमानांच्या पार्किंगची सोय आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे फेऱ्या बंद असल्याने तब्बल ७०० विमानांनी दिल्ली विमानतळावर ठाण मांडले आहे.

loading image
go to top