Coronavirus : 'या' देशाचे मराठी पंतप्रधान करणार पुन्हा डॉक्टरकी; सात वर्षांनी गळ्यात स्टेथस्कोप

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

मुळचे महाराष्ट्रातले असलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सात वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या गळ्यात स्टेथस्कोप अडकवला आहे. राजकारणात आल्यानंतर डॉक्टर असलेल्या वराडकर यांनी आपला पेशा बाजूला केला होता. मात्र कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरकी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त 'सीएनएन' या वृत्तवाहिनीने दिले आहे.

डब्लिन : मुळचे महाराष्ट्रातले असलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सात वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या गळ्यात स्टेथस्कोप अडकवला आहे. राजकारणात आल्यानंतर डॉक्टर असलेल्या वराडकर यांनी आपला पेशा बाजूला केला होता. मात्र कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरकी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त 'सीएनएन' या वृत्तवाहिनीने दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लिओ यांचे वडील अशोक वराडकर १९६० साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथंच स्थायिक झाले. लिओ वराडकर यांचं कुटुंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं. वयाच्या २२व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केले होते. २७ व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. राजकारणात येण्यापूर्वी सात वर्षे त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले होते. आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे वराडकर हे सध्या हंगामी पंतप्रधान म्हणून काम पहात आहेत.

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती?

सीएनएनच्या वृत्तानुसार मार्च महिन्यात वराडकर यांनी पुन्हा एकदा डॉक्टर म्हणून आपली नोंदणी केली. आता ते दर आठवड्याला एक शिफ्ट डाॅक्टर म्हणून काम करणार आहेत. आयर्लंडमध्ये सुमारे पाच हजार कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. आजवर १५८ जणांचा यात मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभर या देशातही लाॅकडाऊन आहे. लोकांना आपल्या निवासस्थानापासून दोन किलोमिटरच्या अंतराच्या पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ireland's PM will work as a doctor during the coronavirus crisis