घाबरू नका! जॉनसन् अँड जॉनसन् बनवतेय कोरोनावर लस!

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यावर लस उपलब्ध करून देण्यासाठी आता जॉनसन् अँड जॉनसन् पुढे आला आहे. त्यासाठी अमेरिकेसोबत करार करून कोरोनाविरोधी लस निर्मिती करणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. तर इटलीमध्ये रुग्णांचे मृतांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातही रुग्णांची संख्या 1,251 वर पोहोचली आहे. मात्र, यावर अद्याप गुणकारी लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे ही गरज लक्षात घेता जॉनसन् अँड जॉनसन् या कंपनीने अमेरिकेसोबत करार करणार असून, या करारानुसार कोरोनावर लस निर्मिती करणार आहे. या करारामार्फत अधिकाधिक लस उपलब्ध केली जाणार आहे. 

Johnson & Johnson expects human testing of its COVID-19 vaccine by ...

सध्या जगभरात ३३ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

घाबरू नका! देशात मृतांचा आकडा वाढणार ...

2021 या वर्षापूर्वी याचा वापर करण्यास परवानागी मिळू शकते, अशी आशा आहे. जॉनसन् ऍंड जॉनसन् बायोमेडिकल एडवांस्ड रिसर्च एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी सोबत लस तयार करण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी ७४०० कोटींची गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे सांगितले. एकदा याची निर्मिती झाली तर याची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाईल आणि कोरोनापासून लढाई करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: J and J Moderna sign deals with US to produce huge quantity of possible coronavirus vaccines