सोशल डिस्टन्सिंग जर्मनीकडून शिका!

जीवन करपे, जर्मनीतील ‘मराठी कट्टा’चे सदस्य
Monday, 13 April 2020

सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नक्की काय? याबाबत खूप वेग वेगळे विचार पुढे येत आहेत. गेली अनेक वर्षे मी युरोपमध्ये राहात आहे आणि युरोपातील दहा देश कामानिमित्त  फिरलो आहे. जर्मनी आणि इतर युरोपीय देशांत मला खूप मोठा फरक मला प्रकर्षाने जाणवला. जर्मनीचा भूभाग हा महाराष्ट्रापेक्षा थोडासा मोठा आहे.. पण जर्मनीमध्ये लहान-मोठी अशी सुमारे १००हून अधिक शहरे आहेत. प्रमुख चार शहरे सोडली तर बाकी सर्व शहरांची लोकसंख्या सात लाखांच्या आत आहे. विशेष म्हणजे सर्व शहरांमध्ये उद्योगधंदे आहेत. त्यामुळे लोकसंख्येची घनता कमी आहे.

कोरोनामुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. जगाच्या तुलनेत जर्मनीमध्ये मृतांची संख्या कमी आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘सोशल डिस्टन्सिंग’ हे महत्त्वाचे अस्त्र आहे, असे सांगितले जाते आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नक्की काय? याबाबत खूप वेग वेगळे विचार पुढे येत आहेत. गेली अनेक वर्षे मी युरोपमध्ये राहात आहे आणि युरोपातील दहा देश कामानिमित्त  फिरलो आहे. जर्मनी आणि इतर युरोपीय देशांत मला खूप मोठा फरक मला प्रकर्षाने जाणवला. जर्मनीचा भूभाग हा महाराष्ट्रापेक्षा थोडासा मोठा आहे.. पण जर्मनीमध्ये लहान-मोठी अशी सुमारे १००हून अधिक शहरे आहेत. प्रमुख चार शहरे सोडली तर बाकी सर्व शहरांची लोकसंख्या सात लाखांच्या आत आहे. विशेष म्हणजे सर्व शहरांमध्ये उद्योगधंदे आहेत. त्यामुळे लोकसंख्येची घनता कमी आहे.

स्थलांतराचे प्रमाणही कमी आहे. जर्मनीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ही एक संस्कृतीच आहे. सिग्नलला थांबल्यानंतरही लोक एकमेकांपासून अंतर राखून थांबतात. शॉपिंग मॉलमध्येही एकमेकांपासून अंतर ठेवतात, सुपर मार्केटमध्ये जाताना आणि बाहेर येताना दरवाजे ऑटोमॅटिक आहेत, जर्मनीमधील घरांमधील अंतरही बरेच असते. इतर देशांसारख्या टोलंजग इमारती जर्मनीत फार बघायला मिळत नाहीत.

जर्मनीत सुमारे ३० टक्के लोक हे एकटे राहतात. त्यांना ‘जिंगल्स’ असे म्हणतात. सुपर मार्केटमध्ये किंवा बऱ्याच कंपन्यांमध्ये हॅन्ड सॅनिटाझरचा वापर ही नियमित सवय आहे. बस, ट्रेनमध्ये गर्दी हा प्रकार नाहीच सोशल डिस्टन्सिंग चे उत्तम उदाहरण म्हणजे जर्मनी! बहुदा याकडे कोणाचेच लक्ष अजून तरी गेलेले नाही. ‘जर्मन स्टॅंडर्ड’चा जो बोलबाला जगामध्ये आहे त्यात या सगळ्या गोष्टींचे महत्त्व खूप आहे. जर्मनीच्या तुलनेत इतर देश हे ‘टुरिस्ट स्पॉट’ आहेत. त्या मुळे सोशल डिस्टन्सिंगला तेथे तिलांजली दिली गेली आहे. इटली, फ्रान्स, स्पेन, नेदरलँड, स्वित्झर्लंड  हे सर्व ‘टुरिस्ट स्पॉट्’ आहेत. त्यामुळे तेथे थोड्याफार प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग बाजूला ठेवले जाते. जर्मनी हा ‘टुरिस्ट स्पॉट’ नाही. तो उद्योजगांचा देश आहे. जर्मनीतील कुटुंबेही लहान आहेत. निसर्गवर प्रेम करणारे, तसेच पुढच्या पिढीला स्वावलंबनाचा आणि निसर्ग प्रेमाचा संदेश देणारे जर्मनच! 

जर्मनीत कार्यालयांमध्ये चर्चा किंवा बैठका या स्काइपच्या माध्यमातून होतात. समोरासमोर चर्चा फार कमी होतात. तसेच कोणाला भेटायला जायचे असेल तर पूर्वपरवानगी आवश्‍यकच, मग ही भेट कार्यालयीन कामकाजासाठी असो वा खासगी. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आपोआप पाळले जाते.  आपल्या देशातील सगळ्याच पक्षांतील नेत्यांनी युरोप आणि इतर प्रगत देश फार पूर्वी पाहिले आहेत. असे असूनसुद्ध आपल्या वाढत्या शहरीकरणाकडे त्यांनी का दुर्लक्ष केले. जर्मनीसारख्या प्रगत देशासारखे ‘मॉडेल’ का नाही वापरले? असा मला प्रश्‍न पडतो. आपण संसदेच्या माध्यमातून शहरांचे नियोजन करून एकाच राज्यात अनेक शहरे का विकसित केल नाहीत हा एक मोठा प्रश्‍न आहे. जपान आणि जर्मनी दुसऱ्या महायुद्धामध्ये उद्ध्वस्त झाले होते. त्याच वेळेस आपल्याला देखील स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत सगळ्या गोष्टी सोयीस्कररित्या बाजूला सारल्या गेल्या. असो, अजून वेळ गेलेली नाही. पुन्हा एकदा विचार करून पुण्या-मुंबईत एकवटलेल्या उद्योगांचे जळगाव, भुसावळ, नांदेड, सोलापूर अशा ठिकाणी विकेंद्रीकरण करा आणि सोशल डिस्टन्सिंगचा धडा जर्मनी कडून घ्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn from social distancing Germany